शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
3
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
4
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
5
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
6
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
7
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
8
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
9
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
10
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
11
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
12
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
13
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
14
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
15
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
16
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
17
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
18
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
19
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
20
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य

तुटलेल्या दोन्ही हातांचे यशस्वी प्रत्यारोपण !

By admin | Updated: February 2, 2015 08:55 IST

अपघातात गमावलेल्या दोन्ही हातांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्याची किमया येथील एका खासगी इस्पितळातील डॉक्टरांनी केली

कोची : अपघातात गमावलेल्या दोन्ही हातांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्याची किमया येथील एका खासगी इस्पितळातील डॉक्टरांनी केली असून, केवळ भारतातच नव्हे तर कोणत्याही विकसनशील देशात अशी विरळा शस्त्रक्रिया फत्ते होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एवढेच नव्हे, तर गौरेतर कातडीचेही जगातील हे पहिलेच यशस्वी प्रत्यारोपण मानले जात आहे.आध्यात्मिक गुरू माता अमृतानंदमयी यांच्या मठातर्फे चालविल्या जाणाऱ्या अमृता इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसच्या डॉक्टरांनी ही अभिमानास्पद कामगिरी पार पाडली. गेल्या १२ व १३ जुलै रोजी केलेल्या या दुहेरी प्रत्यारोपणाच्या यशाची २० दिवस खात्री केल्यानंतर डॉक्टरांनी याची माहिती जाहीर केली. मनू नावाच्या ३० वर्षांच्या व्यावसायिकाला या प्रत्यारोपणाने दोन्ही हात नवे बसविले आहेत. तीन वर्षांपूर्वी महिलेशी गैरवर्तन केल्याच्या संशयावरून सहप्रवाशांनी चालत्या रेल्वे गाडीतून ढकलून दिल्याने मनूला दोन्ही हात मनगट आणि कोपराच्या मध्यापासून गमवावे लागले होते. मनू आता ‘इव्हेन्ट मॅनेजमेंट’चा पूर्वीचा व्यवसाय पुन्हा करू शकेल. डॉक्टरांनी ‘ब्रेन डेड’ म्हणून जाहीर केलेल्या बिनॉय या २४ वर्षांच्या तरुणाच्या हातांचे प्रत्यारोपण मनूच्या हाताच्या तुटलेल्या खुंटांंवर केले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या बिनॉयवर गेले तीन आठवडे दुसऱ्या एका इस्पितळात उपचार सुरू होते. परंतु त्याचा काही उपयोग न झाल्याने डॉक्टरांनी बिनॉयला ‘ब्रेन डेड’ जाहीर केल्यावर त्याच्या नातेवाइकांनी दोन्ही हातांसह त्याच्या अवयवांचे दान केले. हातांचे दान केल्याबद्दल त्याने बिनॉय व त्याच्या कुटुंबीयांना धन्यवाद दिले. खरेतर प्रत्यारोपणानंतर हातांची हालचाल पुन्हा सुरू झाल्यावर त्याने पहिले वाक्य लिहिले, तेच मुळी ‘थँक यू बिनॉय’ असे होते. प्रत्यारोपणानंतर १४ दिवसांनी मनूच्या शरीराने या दोन्ही परक्या हातांचा ‘स्वीकार’ केला आहे. मनूला आयसीयूमधून बाहेर आणण्यात आले असून, प्रत्यारोपित हातांची हालचाल नीट व्हावी यासाठी उपाय केले जात आहेत. सध्या त्याच्या कोपराखालील स्नायूंची हालचाल होत असून, त्यामुळे त्याला दोन्ही हातांची बोटेही हलविता येत आहेत. (वृत्तसंस्था)