ुब्राोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
नवी दिल्ली- २९० किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेल्या ब्रह्मोस या सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राची भारतातर्फे शनिवारी नौदलाच्या विध्वंसक आयएनएस कोलकातावरून यशस्वी चाचणी करण्यात आली.
ुब्राोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
नवी दिल्ली- २९० किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेल्या ब्रह्मोस या सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राची भारतातर्फे शनिवारी नौदलाच्या विध्वंसक आयएनएस कोलकातावरून यशस्वी चाचणी करण्यात आली. गोव्याच्या तटावरून करण्यात आलेल्या या चाचणीत कुठलीही त्रुटी आढळली नाही आणि हे क्षेपणास्त्र आपल्या सर्व निर्धारित मापदंडावर खरे उतरले. गेल्या वर्षी १६ ऑगस्ट रोजी नौदलाच्या बेड्यात सामील झालेले आयएनएस कोलकाता हे सर्वाधिक ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागण्यास सक्षम आहे. संरक्षण विभागातील सूत्रांच्या सांगण्यानुसार सर्वसामान्यपणे एका युद्धनौकेत आठ क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता असते. परंतु आयएनएस कोलकाता मात्र एका पाठोपाठ एक १६ ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा मारा करू शकते. या श्रेणीतील ही पहिलीच युद्धनौका असून अशाप्रकारच्या आणखी दोन जहाजांवर काम सुरू आहे. या तीनही युद्धनौका ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत.या जहाजांमध्ये एका आगळ्यावेगळ्या डिझाईनचे युनिव्हर्सल व्हर्टिकल लॉन्चर (यूव्हीएलएम) वापरण्यात आले असून ते ब्रह्मोस एरोस्पेसने विकसित आणि पेटंट करण्यात आले आहे. ब्रह्मोसचे प्रमुख सुधीर मिश्रा यांनी या यशाबद्दल मोहिमेतील त्यांचे सहकारी आणि नौदलाचे अभिनंदन केले आहे. हे क्षेपणास्त्र यापूर्वीच थलसेना आणि नौसेनेत समाविष्ट झाले असून वायुसेना आवृत्ती परीक्षणाच्या अंतिम टप्प्यात आहे. (वृत्तसंस्था)