पृथ्वी-२ ची यशस्वी चाचणी
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
बालेश्वर : भारताने गुरुवारी स्वदेशी बनावटीच्या आणि अण्वस्त्रवाहू पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली़ ओडिशाच्या चांदीपूरस्थित एकात्मिक चाचणी तळा (आयटीआर)वर सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी ही यशस्वी चाचणी घेण्यात आली़
पृथ्वी-२ ची यशस्वी चाचणी
बालेश्वर : भारताने गुरुवारी स्वदेशी बनावटीच्या आणि अण्वस्त्रवाहू पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली़ ओडिशाच्या चांदीपूरस्थित एकात्मिक चाचणी तळा (आयटीआर)वर सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी ही यशस्वी चाचणी घेण्यात आली़ जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र ३५० कि.मी.पर्यंतचा अचूक लक्ष्यभेद करू शकतो़ द्रव इंधनावर चालणार्या दोन इंजिनांचा समावेश असलेले पृथ्वी-२ आपल्यासोबत ५०० ते १००० किलोग्रॅमपर्यंतची आयुधे वाहून नेण्यास सक्षम आहे़ आयटीआरचे संचालक एमव्हीकेव्ही प्रसाद यांनी ही चाचणी पूर्णत: यशस्वी राहिल्याचे सांगितले़संरक्षण सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सन २००३ पासून पृथ्वी-२ लष्कराच्या सेवेत आहे़ लष्करासाठी तयार केल्या जात असलेल्या क्षेपणास्त्रांपैकी एखाद्या क्षेपणास्त्राची अचानक निवड करून त्याची चाचणी केली जाते़ आजची पृथ्वी-२ ची चाचणी याच स्वरूपाची होती़ अशा चाचणीद्वारे क्षेपणास्त्राची गुणवत्ता तपासली जाते़ (वृत्तसंस्था)