शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

४७० ग्रॅम वजनाच्या बाळावर उदयपुरात यशस्वी शस्त्रक्रिया

By admin | Updated: May 18, 2017 09:37 IST

मुदतीपूर्व जन्माला आलेल्या अवघ्या ४७० ग्रॅम वजनाच्या बाळावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन देत राजस्थानच्या डॉक्टरांनी त्याच्या आई-वडिलांना अपत्यसुख प्राप्त करून दिले.

उदयपूर : मुदतीपूर्व जन्माला आलेल्या अवघ्या ४७० ग्रॅम वजनाच्या बाळावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन देत राजस्थानच्या डॉक्टरांनी त्याच्या आई-वडिलांना अपत्यसुख प्राप्त करून दिले. २८ आठवड्यांनंतर मुदतीपूर्वी जन्माला आलेल्या बाळाची स्थिती नाजूक होती. डोळेही पूर्णत: उघडलेले नव्हते. फुफ्फुसांची वाढही झालेली नव्हती. त्वचा तर चर्मकागदासारखीच होती.लग्न होऊन अनेक वर्षे होऊनही अपत्य सुखासाठी तळमळणाऱ्या या जोडप्याला अखेर आयव्हीएफ (कृत्रिम गर्भधारणा) पद्धती वरदान ठरली. मात्र बाळाच्या हृदयात गुंतागुंत होती. त्यावर एकच उपाय होता, तो हृदयावर शस्त्रक्रिया करणे. ही जोखीम पत्करत गीतांजली मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने या नाजूक बाळावर अत्यंत आव्हानात्मक समजली जाणारी शस्त्रक्रिया यशस्वी करून भारताच्या विशेषत: राजस्थानच्या वैद्यकीय इतिहासाला एका नवा अध्यायच जोडला. एवढेच नाही तर आधुनिक वैद्यकीय तंत्रशास्त्राचा वापर करून भारतातही अशा नाजूक स्थितीत जन्माला आलेल्या बाळांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून नवजीवन देता येऊ शकते, हेही सिद्ध करून दाखविले. (वृत्तसंस्था)हृदयातील दोन रक्तवाहिन्या होत्या चिकटलेल्या...- परिणामी बाळाला मोकळा श्वास घेण्यात अडचण होती. बाळाला तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. सर्वसाधारणपणे मातेच्या उदरातील अर्भकाच्या या दोन्ही रक्तवाहिन्या चिकटलेल्या असतात. प्रसूतीनंतर जन्माला आल्यानंतर बाळाच्या हृदयातील दोन्ही रक्तवाहिन्या आपोआप वेगळ्या होतात. जन्माला आल्यानंतरही हा दोष राहिल्यास औषधोपचार करून हा दोष दूर करता येतो. तथापि, औषधोपचारानंतर दोष कायम राहिल्याचे आढळल्यास शस्त्रक्रिया हाच शेवटचा पर्याय असतो.- शस्त्रकियेद्वारे आईने बाळाला जन्म दिला. ही सुखद वार्ता बाळाच्या आई-वडिलांसाठी क्षणभरच सुखावून गेली. तपासणी डॉक्टरांना आढळले की, बाळाच्या हृदयातील दोन्ही मुख्य रक्तवाहिन्या (महाधमनी आणि फुफ्फुस रोहिणी) एकमेकांना चिकटलेल्या होत्या.