शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

इस्त्रोची भरारी, स्वदेशी बनावटीच्या 'स्पेस शटल'चे यशस्वी प्रक्षेपण

By admin | Updated: May 23, 2016 11:24 IST

अवकाशात उपग्रह सोडण्यासाठी इस्रोने तयार केलेल्या ‘आरएलव्ही-टीडी’ या अवकाशयानाचे (स्पेस शटल) आज, सोमवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली.

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २३ - अवकाशात उपग्रह सोडण्यासाठी इस्रोने तयार केलेल्या ‘आरएलव्ही-टीडी’ या अवकाशयानाचे (स्पेस शटल) आज, सोमवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून या 'स्पेस शटल'चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून इस्रोने ‘आरएलव्ही-टीडी’ हे यान तयार केले आहे. विमानासारखे पंख असलेल्या या यानाची सोमवारी सकाळी ७ वाजता श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाशतळावर यशस्वी चाचणी झाली. त्याचा कालावधी १० मिनिटांचा होता. 
दरम्यान उपग्रहाला अवकाशात सोडल्यानंतर यानाला विमानासारखे पृथ्वीवर आणण्याच्या तंत्रज्ञानावर इस्त्रो काम करत आहे. जेणेकरुन त्या यानाचा पूर्नवापर करता येईल. या तंत्रज्ञानामुळे उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च दहा पटीने कमी होणार आहे. अशा प्रकारच्या यानाच्या अत्याधुनिक आवृत्तीचा मानवी अवकाश मोहिमांसाठी वापर होऊ शकते. 'आरएलव्ही-टीडी' यानाची ही प्राथमिक चाचणी असल्याने हे यान आज नियंत्रितपणे बंगालच्या खाडीत उतरवण्यात आले.
स्वदेशी बनावटीचे पूर्णपणे विकसित पूर्नवापरा योग्य अवकाश यान तयार करण्यासाठी दशकभराचा कालावधी लागेल असे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक के.सिवान यांनी नमूद केले होते.
याआधी अंतराळ तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या अमेरिका व इतर काही देशांनी उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी व अंतराळ सफरींसाठी अशा ‘स्पेस शटल’चा वापर केला. मात्र कालांतराने त्याला होणारे अपघात व न परवडणाऱ्या आर्थिक गणितांमुळे त्यांनी ही कल्पना सोडून दिली वा अशा वाहनांचा वापर बंद केला. भारताच्या अभियंत्यांनी मात्र काटकसरीवर भर देत रॉकेटच्या पुनर्वापरावर भर देण्याचे ठरवले आहे. 
 
  फायदा काय?
> ही चाचणी यशस्वी झाल्यास एखादा उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर त्यासाठी वापरलेल्या यानाचा पुन्हा वापर करणे शक्य होईल.
> या तंत्रज्ञानामुळे उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च दहा पटीने कमी होणार आहे. अशा प्रकारच्या यानाच्या अत्याधुनिक आवृत्तीचा मानवी अवकाश मोहिमांसाठी वापर होऊ शकेल.