शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

भारताच्या नव्या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

By admin | Updated: November 12, 2015 00:09 IST

भारताचा नवा दूरसंचार उपग्रह जीसॅट-१५ ला बुधवारी भल्या पहाटे युरोपियन अ‍ॅरियन ५ व्हीए-२२७ प्रक्षेपण वाहनाद्वारे अवकाशात यशस्वीरीत्या सोडण्यात आले.

बंगळुरू : भारताचा नवा दूरसंचार उपग्रह जीसॅट-१५ ला बुधवारी भल्या पहाटे युरोपियन अ‍ॅरियन ५ व्हीए-२२७ प्रक्षेपण वाहनाद्वारे अवकाशात यशस्वीरीत्या सोडण्यात आले. ३,१६४ किलोग्रॅम वजनाच्या जीसॅट-१५ सोबत दूरसंपर्क ट्रान्सपाँडर्स केयू-बँड आणि जीपीएसचे साह्य असलेली जीईओ आॅगमेंटेड नॅव्हिगेशन पेलोड आॅपरेटिंग एल वन आणि एल ५ बँडस्मध्ये काम करील. हे प्रक्षेपण फ्रेंच गुईयानातील कौरोऊ येथील युरोपीयन स्पेस पोर्टवर अ‍ॅरियन लाँच पॅडवरून झाले.शेवटच्या ११ तास ३० मिनिटांची उलटगिनती सहजपणे झाल्यानंतर प्रक्षेपण वाहन अ‍ॅरियन ५ ने भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ३ वाजून ४ मिनिटांनी उपग्रहाला उचलले, असे इस्रोने वृत्तपत्र निवेदनात म्हटले. ४३ मिनिटे व २४ सेकंदांच्या उड्डाणानंतर जीसॅट-१५ अ‍ॅरियन ५ पासून वरच्या बाजूला लंबवर्तुळाकार अशा (जिओसिंक्रोनोऊस ट्रान्सफर आॅर्बिट-जीटीओ) भ्रमणकक्षेत चंद्राच्या पृथ्वीपासून समीपतम बिंदूपाशी आणि पृथ्वीपासून सर्वात दूर अशा ३५,८१९ किलोमीटरवर गेला. आता साध्य झालेली भ्रमणकक्षा ही ती जी अपेक्षित होती तिच्या खूप जवळची आहे. इस्रोच्या कर्नाटकातील मुख्य नियंत्रण केंद्राने (मास्टर कंट्रोल फॅसिलिटी) या उपग्रहाची सूत्रे आणि नियंत्रण हाती घेतले असून त्याने उपग्रहाच्या केलेल्या प्राथमिक तपासणीत त्याचे आरोग्य नियमित असल्याचे स्पष्ट झाले. उपग्रह जिओ स्टेशनरी भ्रमणकक्षेत (विषुववृत्ताच्या वर ३६ हजार किलोमीटरवर) ठेवण्यासाठी येत्या दिवसांत भ्रमणकक्षा वाढविण्याचे योजनाबद्ध प्रयत्न केले जातील. (वृत्तसंस्था)