शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या IRNSS- 1E उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

By admin | Updated: January 20, 2016 12:54 IST

श्रीहरीकोटा येथून इस्त्रोच्या ‘आयआरएनएसएस-१’ या पाचव्या उपग्रहाचे 'पीएसएलव्ही-सी ३१'मधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत

चेन्नई, दि. २० - इस्रोच्या (भारतीय अवकाश संशोधन संस्था)  ‘आयआरएनएसएस-१’ या पाचव्या दिशादर्शक उपग्रहाचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.  'पीएसएलव्ही-सी ३१’ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून आज सकाळी या उपग्रहाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण झाल्याने असून नवीन वर्षात इस्त्रोची पहिली मोहीम यशस्वी ठरली. झाले. चेन्नईहून सुमारे १०० किमी दूर असलेल्या श्रीहरीकोटा येथून बुधवारी सकाळी ९ वाजून ३१ मिनिटांनी या उपग्रहाने यशस्वी उड्डाण केले. ४४.४ मीटर इतकी उंची असलेल्या या उपग्रहाचे वजन १४२५ ग्रॅम इतके आहे. या यशस्वी उड्डाणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
भारताने आत्तापर्यंत चार दिशादर्शक उपग्रह (आयआरएनएसएस-१ए, १बी, १सी आणि १डी) अवकाशात सोडले आहेत. १ जुलै २०१३ साली आयआरएनएसएस-१ए, तर एप्रिल २०१४ मध्ये आयआरएनएसएस-१बी प्रक्षेपित करण्यात आले. १६ ऑक्टोबर २०१४ साली आयआरएनएसएस- १सी आणि २८ मार्च २०१५ मध्ये आयआरएनएसएस-१डी चे यशस्वी प्रक्षेपण झाले. अवकाशातील सात व पृथ्वीवरील दोन अशा एकूण नऊ उपग्रहांच्या साहाय्याने भारतीय दिशादर्शक यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहिती "इस्त्रो‘तील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
 
- भारताने आज पीएसलव्ही -सी ३१ या प्रक्षेपकाव्दारे  IRNSS- 1E या पाचव्या दिशादर्शन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. 
- पुढच्या दोन महिन्यात आणखी दोन दिशादर्शक उपग्रह अवकाशात पाठवण्यात येणार असून, त्यानंतर भारताची स्वत:ची दिशादर्शक यंत्रणा कार्यान्वित होईल. 
- याआधी पाठवण्यात आलेल्या चार दिशादर्शक उपग्रहांनी आपले काम सुरु केले आहे. 
- भारताची दिशादर्शक यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत जगातील असा चौथा देश असेल ज्याच्याकडे स्वत:ची उपग्रह आधारीत दिशादर्शक यंत्रणा असेल. अमेरिकेच्या तोडीची जीपीएस यंत्रणा भारताकडे असेल. 
- या दिशादर्शक यंत्रणेमुळे भारताच्या ज्या सीमा आहेत त्या अधिक सुरक्षित होणार असून, लष्कराला विशेषकरुन क्षेपणास्त्र लक्ष्यभेद करण्यासाठी मदत मिळणार आहे. 
- भारताच्या भरवशाच्या पीएसएलव्ही प्रक्षेपकाव्दारे केलेले हे ३३ वे यशस्वी प्रक्षेपण होते. इस्त्रोची नव्या वर्षातील ही पहिलीच मोहिम असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.