शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध मातेच्या संघर्षाला यश, नेपाळच्या तुरुंगातून मुलाची सुटका; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 05:41 IST

चार वर्षांनी मुलगा परतला, अपघाताच्या गुन्ह्यात झाली हाेती शिक्षा

वाराणसी : परदेशातील तुरुंगामध्ये कैदेत असलेल्या मुलाला साेडविण्यासाठी वाराणसीतील एका मातेने प्रयत्नांची शर्थ केली. अखेर या प्रयत्नांना यश आले असून चार वर्षांनी तिचा मुलगा भारतात परतला. मुलाला भेटताच या मातेच्या डाेळ्यातून आनंदाश्रू तरळले.

ही गाेष्ट आहे ७५ वर्षांच्या अमरावती देवी यांची. त्यांचा मुलगा महेंद्र हा व्यवसायाने ट्रकचालक आहे. ट्रकमध्ये भाजी घेऊन ताे काठमांडूला जात हाेता. नेपाळच्या हद्दीत वाटेतच एका दुचाकीस्वाराला त्याच्या ट्रकची धडक बसली आणि त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. यासाठी महेंद्रला दाेषी ठरवून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

नेपाळच्या कायद्यानुसार दंड भरून तुरुंगातून सुटका करण्याची तरतूद आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेले ७ लाख रुपये अमरावती देवींच्या कुटुंबाकडे नव्हते. तेथूनच त्यांचा संघर्ष सुरू झाला. काेणताही व्हीआयपी वाराणसीला आल्यास त्यांच्या ताफ्यासमाेर त्या मुलाच्या सुटकेसाठी धाव घेत. मात्र, पीएमपासून सीएमपर्यंत काेणीही त्यांची मदत केली नाही. त्यांनी जिल्हा प्रशासनापासून राजदूतावासापर्यंत उंबरठे झिजवले. परंतु, कुठूनही मदत मिळाली नाही.

भीक मागण्याची वेळअमरावती देवींना रस्त्यावर भीक मागताना पाहून अखेर बनारस हिंदू विद्यापीठाचे काही माजी विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांनी दंडाची रक्कम गाेळा करून मदत केली. त्यांना अर्धीच रक्कम गाेळा करण्यात यश आले हाेते. अखेर त्यांना नेपाळमधील चाैधरी फाउंडेशनची मदत झाली. फाउंडेशनने उर्वरित रक्कम भरली आणि महेंद्र यांची सुटका झाली. 

टॅग्स :NepalनेपाळPrisonतुरुंग