पारख क्लासच्या विद्यार्थ्यांचे यश
By admin | Updated: June 12, 2015 17:38 IST
नाशिक : रविवार कारंजा येथील आशा ग्रुप संचलित पारख क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यंदाही कॉमर्स विभागात उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. बारावीत दीपक शिंदे या विद्यार्थ्याने ९९ टक्के गुण मिळविले आणि तो प्रथम आला. नीलेश उखर्डे संपूर्ण नाशिकमध्ये ९२.५३ टक्के गुण मिळवून अकरावीत प्रथम आला. सीए सीपीटीच्या परीक्षेतही क्लासच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या यशाबद्दल क्लासच्या विद्यार्थ्यांचा उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा. हितेश पारख यांनी क्लासचा निकाल १०० टक्के लागल्याचे सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ऐश्वर्या बुरड (एसपी ९४), सोनाली पेरियार (इको ९६), लोकेश बुरड (ओसी ९१) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. क्लासमधील २४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले. त्यांना क्लासच्या संचालक राखी पारख, शिक्षक सीए लोकेश पारख, प्रा. हितेश पारख यांचे मार्गदर्शन लाभले.
पारख क्लासच्या विद्यार्थ्यांचे यश
नाशिक : रविवार कारंजा येथील आशा ग्रुप संचलित पारख क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यंदाही कॉमर्स विभागात उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. बारावीत दीपक शिंदे या विद्यार्थ्याने ९९ टक्के गुण मिळविले आणि तो प्रथम आला. नीलेश उखर्डे संपूर्ण नाशिकमध्ये ९२.५३ टक्के गुण मिळवून अकरावीत प्रथम आला. सीए सीपीटीच्या परीक्षेतही क्लासच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या यशाबद्दल क्लासच्या विद्यार्थ्यांचा उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा. हितेश पारख यांनी क्लासचा निकाल १०० टक्के लागल्याचे सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ऐश्वर्या बुरड (एसपी ९४), सोनाली पेरियार (इको ९६), लोकेश बुरड (ओसी ९१) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. क्लासमधील २४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले. त्यांना क्लासच्या संचालक राखी पारख, शिक्षक सीए लोकेश पारख, प्रा. हितेश पारख यांचे मार्गदर्शन लाभले. फोटो स्कॅनिंगला सोडला आहे.