शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधकामाचे विषय फेरसादर स्थायी सभा: अनुदानाची माहिती दिली अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2015 02:55 IST

सोलापूर : शासनाकडून आलेल्या अनुदानाबाबत अर्धवट माहिती दिल्याने इंदिरानगर व संजयनगर येथे सार्वजनिक शौचालय बांधण्याचे विषय फेरसादर करण्याचा निर्णय स्थायी सभेत एकमताने घेण्यात आला.

सोलापूर : शासनाकडून आलेल्या अनुदानाबाबत अर्धवट माहिती दिल्याने इंदिरानगर व संजयनगर येथे सार्वजनिक शौचालय बांधण्याचे विषय फेरसादर करण्याचा निर्णय स्थायी सभेत एकमताने घेण्यात आला.
स्थायी समितीची सभा सभापती पद्माकर काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत प्रभाग क्र. 8 मधील इंदिरानगर येथे शासनाकडून आलेल्या निधीतून 7 लाख 32 हजार खचरून बांधण्यात येत असलेल्या शौचालयाचा मक्ता सिद्धतेज कन्स्ट्रक्शनला दिला आहे. तसेच प्रभाग 39 मधील संजयनगरातही इतकीच रक्कम खर्च करून सार्वजनिक शौचालय बांधण्याचा के. अमित कन्स्ट्रक्शनला दिलेली वर्कऑर्डर माहितीस्तव पाठविली होती. यात शासनाच्या निधी किती आला, यातून किती कामे झाली आणि आणखी किती पैसे शिल्लक आहेत, असा सवाल सुरेश पाटील, आनंद चंदनशिवे यांनी केला. बाबा मिस्त्री यांनी प्रकरणासोबत याबाबत काहीच माहिती जोडली नसल्याचे निदर्शनाला आणले. त्याचबरोबर आडवा नळ ते मरिआई मंदिर, माटे बगिच्यापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण, जाम मिल ते सनसिटी, शेटेवस्ती ते देशमुख?पाटीलवस्तीपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे बजेटबाबतची माहितीसह प्रकरण फेरसादर करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.
सलगरवस्ती, इंदिरानगर ते कोळी समाज सोसायटी, विजापूर महामार्गावरील गौतमनगरातील फूटपाथवर पेव्हर ब्लॉक घालणे, गीतानगर येथील मोकळय़ा जागेस कुंपण बांधणे, बालाजी हौसिंग सोसायटीत व्यायामशाळा बांधण्याचा दिलेला मक्ता, पाण्याच्या प्रयोगशाळेसाठी रसायन खरेदी, संभाजी आरमारला कार्यालयासाठी काँग्रेसभवन शेजारील मोकळी जागा भाड्याने देण्याच्या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी देण्यात आली.