शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण उद्योग नाशकात सुभाष भामरे : उद्योजकांशी साधला संवाद

By admin | Updated: October 5, 2016 01:30 IST

सातपूर : उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी संरक्षण क्षेत्राशी निगडित उद्योग नाशिकला आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुरेश भामरे यांनी उद्योजकांना दिले.

सातपूर : उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी संरक्षण क्षेत्राशी निगडित उद्योग नाशिकला आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुरेश भामरे यांनी उद्योजकांना दिले. नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या सभागृहात आयोजित उद्योजकांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. डॉ. भामरे यांनी पुढे सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारने धोरणात बदल केले आहेत. मेक इन इंडियावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. संरक्षण क्षेत्रातील उद्योगातदेखील ४९ टक्के गुंवणुकीसाठी मुक्त करण्यात आले आहे. नाशिकमध्ये गुंतवणुकीला वाव आहे. नाशिक जिल्‘ाच्या उद्योग विकासासाठी संरक्षण क्षेत्राशी निगडित शस्त्रास्त्र कारखाना पब्लिक सेक्टर युनिट यासारखे उद्योग नाशिकला आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्याचप्रमाणे एफ.जी.एफ.ए. (फिप्थ जनरेशन फायटर एअर क्राफ्ट) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नाशिकला व्हावा यासाठी चालना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.प्रास्ताविक नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष नरेंद्र गोलिया यांनी केले. निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राची माहिती दिली. डॉ. भामरे यांच्या हस्ते टाटा ट्रस्ट पुरस्कृत कुशल रोजगार पोर्टलचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार नरेंद्र पवार, संतोष मंडलेचा, विक्र म सारडा, संजीव नारंग, उदय खरोटे, मंगेश पाटणकर, नरेंद्र बिरार, सुनील भयबंग, राजेंद्र अहिरे, वरु ण तलवार, उन्मेष कुलकर्णी, आशिष नहार, संजय सोनवणे, मनीष रावळ, डॉ. प्रशांत पाटील, लक्ष्मण सावजी, प्रदीप पेशकार, सुरेश पाटील, राजेश दराडे, रामहरी संभेराव, अजय थोरात आदिंसह उद्योजक उपस्थित होते. सूत्रसंचालन मनीष कोठारी यांनी केले. पी. एस. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर).फोटो आर फोटोवर ०४ निमा नावाने सेव्ह. ओळी- नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या सभागृहात बोलताना संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे. समवेत हरिशंकर बॅनर्जी, नरेंद्र गोलिया, नरेंद्र पवार आदि.