शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांकडूनच सुरू आहे स्टंटबाजी

By admin | Updated: April 25, 2016 00:27 IST

विद्या बाळ : बलराज साहनी व साहीर लुधियानवी फाऊंडेशनतर्फे पुरस्कार वितरण

विद्या बाळ : बलराज साहनी व साहीर लुधियानवी फाऊंडेशनतर्फे पुरस्कार वितरण
पुणे : सध्या मंदिरप्रवेशावरुन चालू असलेल्या वादावर अनेक उलटसुलट चर्चा चालू आहेत. यामध्ये तृप्ती देसाई, गुप्ते यांसारख्या महिला स्टंटबाजी करत असल्याचे बोलले जात असताना कोणतीही ठोस भूमिका न घेतलेले मुख्यमंत्री खरी स्टंटबाजी करत आहेत. असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केला.
बलराज सहानी व साहीर लुधियानवी फाऊंडेशनच्या वतीने रविवारी पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात पुरस्कार सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी अभिनेता ओंकार गोवर्धन याला बलराज सहानी पुरस्काराने तर लेखक संजय पवार यांना कैफी आझमी पुरस्काराने बाळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर फाऊंडेशनचे सचिव सुरेश टिळेकर, दिग्दर्शक धम्मर्कीर्ती सुमंत, अलका देशपांडे व अनिकेत बाळ उपस्थित होते.
बाळ म्हणाल्या, 'महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत शासन आणि मुख्यमंत्री कोणतीही ठोस भूमिका घेत नाहीत ही खेदाची बाब आहे. तर या अधिकारासाठी लढणार्‍या महिलांना अशाप्रकारे मार खावा लागतो ही वाईट गोष्ट आहे. महिलांच्या मंदिर प्रवेशाचा कायदा ५६ सालीच झालेला असून त्यासाठी भांडण्याची आवश्यकता नसून या कायद्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.' बाईच्या पाळीचा शास्त्रीय आधार अपवित्र मानला जात असेल तर त्यामध्ये काही तथ्य नाही. सध्या प्रत्येकाच्या तोंडाला कुलूपे लावली जात असून दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि कन्हैया ही त्याची उदाहरणे आहेत. फुले, शाहू आणि आंबेडकरांची नावे घेऊन मोठमोठ्या बाता केल्या जातात, मात्र कोणत्याही गोष्टीचा प्रत्यक्ष अवलंब होताना दिसत नाही.
नक्की राष्ट्रद्रोही कोण ?
रविवारी कन्हैया कुमारचे पुण्यात भाषण होते. त्याविषयी बोलताना बाळ म्हणाल्या, कन्हैयावरील राष्ट्रद्रोहाचे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. तरीही त्याला काही जणांकडून राष्ट्रद्रोही ठरविले जात आहे. त्यामुळे तो राष्ट्रद्रोही आहे की त्याला राष्ट्रद्रोही ठरविणारे खरे राष्ट्रद्रोही आहेत याचा विचार व्हायला हवा.