शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

विद्यार्थ्यांचे आंदोलन भडकावण्याचा प्रयत्न

By admin | Updated: May 15, 2016 05:15 IST

इस्लामिक स्टेट (इसिस) ही दहशतवादी संघटना भारतात अनेक कारवाया करणार असल्याची भीती अनेकदा व्यक्त होत आली आहे. मात्र आता हे वृत्त खरेच असल्याचे स्पष्ट झाले आहे

नवी दिल्ली : इस्लामिक स्टेट (इसिस) ही दहशतवादी संघटना भारतात अनेक कारवाया करणार असल्याची भीती अनेकदा व्यक्त होत आली आहे. मात्र आता हे वृत्त खरेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजधानी दिल्लीतील जेएनयू व कन्हैया कुमार दरम्यान झालेल्या वादाच्या निमित्ताने आपल्या कारवाया सुरू करा, असा आदेश आपल्याला देण्यात आला होता, असे भारतातील इसिसमध्ये तरुणांना भरती करणाऱ्या म्होरक्यांनी दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. जुनुद अल खलीफा-ए-हिंद (जेकेएच) या भारतातील इसिसच्या शाखेतील आशिक अहमद उर्फ राजा, मोहम्मद अब्दुल अहद आणि मोहम्मद अफजल या तिघांनी पोलिसांसमोर दिलेल्या जबाबातून ही बाब उघडकीस आली आहे.जेएनयूमधील वादग्रस्त कार्यक्रमानंतर कन्हैयाकुमार देशद्रोहाच्या आरोपाखाली तिहार तुरुंगात असताना, त्याच्या सुटकेसाठी अनेक विद्यापीठातील हजारो विद्यार्थी आंदोलन करत होते. त्याचवेळी इसिसच्या अहमद अलीने पश्चिम बंगालमधील १९ वर्षीय आशिक अहमद उर्फ राजाला या आंदोलनात सहभागी होऊन वाहनांची जाळपोळ तसेच तोडफोड करण्याच्या सूचना दिल्या होत्या.एनआयएने इसिसशी संबंधित व्यक्तीचे जबाब भारतीय दंडविधानाच्या कलम १६४ अंतर्गत नोंदवून घेतले आहेत. या तिघांनी आपल्या जबानीत बंगळुरू, पश्चिम बंगाल व पंजाबमधील बैठकीत उपस्थित होतो, असे कबूल केले आहे. आशिकने दिलेल्या जबाबानुसार, अहमद अली हा स्वत:ची अन्सर-उत तौहीद फि बिलाद अल-हिंद अशी ओळख सांगत असे. त्याने १९ फेब्रुवारी रोजी ट्रिलियन अ‍ॅपवरील अकाऊंटद्वारे माझ्याशी संपर्क साधला होता. सुरक्षा यंत्रणा आपल्यावर नजर ठेवून असल्याचे त्याने सांगितले होते. यावेळी देशभरात विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू असून, आपण त्याचा फायदा उठवला पाहिजे. या आंदोलनात सहभागी होऊन हिंसाचार घडवून आणाला, असेही तो मला म्हणाला, असे आशिकने नमूद केले. हा अहमद अली म्हणजे भारतातील इसिसचा प्रमुख शफी अरमार असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला असून, तो नुकताच अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)