शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपला ३ कोटींचे भांडवल

By admin | Updated: March 17, 2017 01:16 IST

येथील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या चेतन गोलेच्छा, मृगांक गुज्जर आणि उत्सव जैन या तीन विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप कंपनीला ३ कोटींचे भांडवल मिळाले आहे

जयपूर : येथील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या चेतन गोलेच्छा, मृगांक गुज्जर आणि उत्सव जैन या तीन विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप कंपनीला ३ कोटींचे भांडवल मिळाले आहे. ‘इन्फ्युजन बेव्हरेजेस’ या नावाची त्यांची कंपनी असून, ती सुगंधी पाणी बनविते.हे तिघे जयपूरमधील नीरजा मोदी शाळेचे विद्यार्थी आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी एका उद्योजकता महोत्सवात सहभाग घेतला होता. वर्षभरातच त्यांचा उपक्रम एका कंपनीत रुपांतरित झाला आहे. चेतन गोलेच्छा याने सांगितले की, आमचे उत्पादन महोत्सवातील परीक्षकांना आवडले नव्हते. आम्ही पहिल्या फेरीतच बाद होऊन स्पर्धेबाहेर फेकले गेलो. मात्र, या महोत्सवाच्या पहिल्या एक तासातच आम्हाला १५0 बाटल्यांची आॅर्डर मिळाली. लोकांना आमचे सुगंधी पाणी आवडले होते.मृगांक गुज्जरने सांगितले की, प्रीझर्वेटिव्ह तसेच साखर आणि सोडा न वापरता सुगंधी पाणी तयार करणे ही आमची मध्यवर्ती कल्पना होती. त्यासाठी आम्ही गुगलवर खूप संशोधन केले. पण आम्ही अल्पवयीन असल्यामुळे आम्हाला कोणतीही सरकारी परवानगी मिळू शकत नव्हती. सर्व परवानग्या आम्हाला पालकांच्या नावे मिळवाव्या लागल्या.या त्रिकूटाने आयआयटी कानपूर आणि आयआयएम इंदूर यांच्या उद्योजकता स्पर्धेतही भाग घेतला. मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने त्यांना साह्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना मोठे बळ मिळाले. त्यांना पेटंट मिळण्यासाठी संस्थेने मदत केली. त्यांचा अर्ज आता अंतिम टप्प्यात आहे. केवडा, गुलाब आणि बेल यांचा सुगंध असलेले पाणी ते सध्या उत्पादित करतात. जानेवारीपर्यंत त्यांनी ८ हजार बाटल्या विकल्या आहेत. उत्सव जैन याने सांगितले की, यंदा जानेवारीत एका गुंतवणूकदाराने त्यांना इंदुरात बोलावले. बैठक यशस्वी झाली. ३ कोटींचे भांडवल पुरविण्याचे त्याने मान्य केले. करारानुसार, प्रकल्प इंदुरात राहील. त्रिकूटाकडे मार्केटिंग आणि संशोधनाची जबाबदारी असेल. (वृत्तसंस्था)