शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

बसेस वेळेवर नसल्याने विद्यार्थ्यांची पायपीट

By admin | Updated: July 10, 2015 00:35 IST

पाच किलोमीटरचा त्रास : पालक -विद्यार्थी संतप्त नियोजित वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांची पायपीट

पाच किलोमीटरचा त्रास : पालक -विद्यार्थी संतप्त नियोजित वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांची पायपीटनिकवेल : त्यांना पाच किलोमीटर पायी प्रवास करीत शाळेत जावे लागल्याने, विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बुधवार (दि. ८) निकवेल येथील १५ ते २० विद्यार्थी व विद्यार्थींनी निकवेलहून शाळेत, डांगसौंदाणा येथील माध्यमिक विद्यालयामध्ये जातात. ११ ते ५ ही शाळेची वेळ असून, शाळेमध्ये जाण्यासाठी मानव विकास योजनेअंतर्गत शालेय एस.टी.बसेस आहेत. मात्र एस.टी. महामंडळाचा भोंगळ कारभारामुळे एस.टी. बसेस वेळेवर नसल्या कारणामुळे काल सर्वच विद्यार्थी हे डांगसौंदाणाहून पायी पायी चालत घरी पोहचले. सदर प्रकार विद्यार्थीनी सर्व प्रकार आपल्या पालकांकडे सांगितल्यामुळे पालकामध्ये एस.टी. महामंडळा विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाच वाजेच्या सुमारास सटाणा आगाराची डांगसौंदाणाहून कुठल्याही प्रकारे बस उपलब्ध नसल्या कारणाने विद्यार्थींना रोजच त्रास सहजन करावा लागत आहे. एस.टी. बस जर पकडायची असेल तर विद्यार्थींना शाळा सुरु असतांना शाळेबाहेर पडावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे एस.टी.मुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. चौकट : निकवेल ते डांगसौंदाणा हे अंतर सहा किलोमीटर आहे बसेस वेळेवर नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे, सटाणा एस.टी. महामंडळाच्या मानव विकास योजनेअंतर्गत खास विद्यार्थींना घेऊन जाणे, घेऊन येणे ह्यासाठी स्कूल बस म्हणून आहेत. मात्र सदर बसेस विद्यार्थींसाठी नसून ती अन्य प्रवाशी वाहतुक करीत आहे. विद्यार्थ्यांकरिता सदर बसेस वेळेवर सोडावी यासंदर्भात वारंवार सटाणा एस.टी. महामंडळाकडे तोंडी तक्रार केल्यावर सुद्धा विद्यार्थींना वेळेवर बस उपलब्ध होत नाही. मानव विकास योजनेअंतर्गत एस.टी. बसच्या दर्शनी भागावर स्कूल बस हे ठळक अक्षराने लिहुन ठेवले आहे तरी विद्यार्थींना का बस उपलब्ध होत नाही? असा सवाल पालकांनी केला आहे तर संबंधीत विभागाने यांची दखल घेऊन विद्यार्थींना ५ वाजेच्या सुमारास डांगसौदाणा येथे बस उपलब्ध व्हावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव निकवेलचे सरपंच दीपक वाघ, जगदिश वाघ, निंबा वाघ, प्रल्हाद वाघ, सुनील वाघ, अशोक पवार, नीलेश वाघ, विवेक सोनवणे, संदीप सोनवणे, संतोष जाधव आदि ग्रामस्थांनी केली आहे.