शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयचे विद्यार्थी गुन्हेगार नाहीत - राहुल गांधी

By admin | Updated: August 19, 2015 13:45 IST

एफटीआयआयचे विद्यार्थी गुन्हेगार नसल्याचे सांगत मौन, निलंबन व अटक हाच मोदींच्या 'अच्छे दिन'चा मंत्र आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - पोलिसांनी मध्यरात्री एफटीआयआयच्या कॅम्पसमध्ये शिरून विद्यार्थ्यांना अटक केल्याप्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ' एफटीआयआयचे विद्यार्थी गुन्हेगार नसल्याचे सांगत गप्प करा, निलंबित करा व अटक करा हाच मोदींच्या  'अच्छे दिन'चा मंत्र आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. एफटीआयआयचे  संचालक प्रशांत पाठरांबे यांनी विद्यार्थ्यांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी काल रात्री सव्वाच्या सुमारास कॅम्पसमध्ये प्रवेश करून ५ विद्यार्थ्यांना अटक करत त्यांना डेक्कन जिमखाना पोलिस स्थानकात नेले. पोलिसांच्या या कारवाईचा सर्वत्र निषेध होत असून हा वाद आणखीनच चिघळला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनीही या घटनेबद्दल नाराजी नोंदवली आहे. ' मोदीजी, ( एफटीआयआयचे) हे विद्यार्थी गुन्हेगार नाहीत. गप्प करा,निलंबित करा व अटक करा हाच मोदींच्या 'अच्छे दिन'चा मंत्र आहे' असे ट्विट करत राहुल यांनी सरकारवर टीका केली आहे. यापूर्वीही राहुल यांनी एफटीआयआच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला होता. गेल्या महिन्यात आंदोलनाच्या ५० व्या दिवशी राहुल यांनी पुण्यात विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी  शिक्षण संस्था तसेच अन्य संस्थांमध्ये भाजपा हस्तक्षेप करत असून विद्यार्थ्यांवर संघाचे विचार लादण्याचा प्रयत्न सुरू आहेत अशी टीका करत त्यांनी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला. 
गजेंद्र चौहान यांची निवड गुणवत्तेवर झाला नसल्याचा आरोप करत चौहान यांच्यासह नियामक मंडळाच्या सदस्यांची नियुक्ती रद्द करावी, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत गजेंद्र चौहान यांना पद सोडण्याचा सल्ला दिला. मात्र चौहान हे पायउतार होण्यास तयार नसून दुसरीकडे विद्यार्थीही त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत.