शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो सावधान : देशात २३ विद्यापीठे व ३४१ तंत्रशिक्षण संस्था बोगस

By admin | Updated: March 20, 2017 19:38 IST

विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी)ची मान्यता नसलेली देशाच्या विविध राज्यात २३ बोगस विद्यापीठे आहेत. ज्यांना पदव्या प्रदान करण्याचा कोणताही अधिकार नाही.

सुरेश भटेवरानवी दिल्ली, दि. 20  : विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी)ची मान्यता नसलेली देशाच्या विविध राज्यात २३ बोगस विद्यापीठे आहेत. ज्यांना पदव्या प्रदान करण्याचा कोणताही अधिकार नाही. त्याचप्रमाणे आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ची मान्यता नसलेल्या देशात ३४१ संस्था व महाविद्यालये आहेत, ज्यांना तंत्रशिक्षण क्षेत्रात पदवीचे शिक्षण देण्याची अनुमती नाही. तरीही विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ करीत बिनबोभाट त्यांनी आपला कारभार चालवला आहे. अशी विद्यापीठे व तंत्रशिक्षण संस्थांची त्वरित चौकशी करून त्यांच्या विरूध्द पोलीस तक्रार करावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांची फसवणूक थांबवावी, अशा सुचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राज्य सरकारांना दिल्या आहेत, राज्यसभेत ही माहिती मनुष्यबळ विकास राज्यमंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी दिली.

देशात (युजीसी)ची मान्यता नसलेल्या २३ बोगस विद्यापीठांपैकी ७ बोगस विद्यापीठे राजधानी दिल्लीत आहेत तर महाराष्ट्रात नागपूर येथे राजा अरेबिक विद्यापीठाचे नाव युजीसीच्या अमान्य विद्यापीठांच्या यादीत आहे. तंत्रशिक्षण क्षेत्रात देशातल्या ३४१ संस्था व महाविद्यालयांना (एआयसीटीई) ची मान्यता नाही. यापैकी दिल्लीत ६६ तर मुंबई आणि महाराष्ट्रात एकुण ७७ संस्था आहेत. महाराष्ट्रातल्या बोगस संस्थांमधे मुंबईत ४१, नवी मुंबईत ११, ठाण्यात ११, कल्याणला २, याखेरीज पुण्यात ७, नाशिक जिल्हयात ३, कोल्हापूर, अहमदनगर व औरगाबाद येथे प्रत्येकी १ अशी त्यांची विभागणी आहे. युजीसी www.ugc.ac.in व एआयसीटीईच्या www.aicte-india.org वेबसाईटवर या बोगस विद्यापीठे व अमान्य तंत्रशिक्षण संस्था व महाविद्यालयांची संपूर्ण यादी प्रकाशित करण्यात आली आहे.

देशभर पुढल्या महिन्यात विविध महाविद्यालये व विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. यावेळी तमाम विद्यार्थ्यांनी आपण प्रवेश घेत असलेले विद्यापीठ, संस्था अथवा महाविद्यालयास युजीसी अथवा एआयसीटीई ची मान्यता आहे की नाही, याची खात्री करूनच प्रवेश घ्यावा, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. दिल्लीखेरीज, मुंबई, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, तेलंगणा, प.बंगाल, या ठिकाणी बोगस विद्यापीठे व बोगस तंत्रशिक्षण संस्थाचा सुळसुळाट झाला आहे. त्यांनी प्रदान केलेल्या तथाकथित पदव्या अथवा प्रमाणपत्रांची किंमत रद्दी कागदापेक्षा अधिक नाही. याची जाणीव युवीसी व एआयसीटीई ने आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या या बोगस विद्यापीठे व संस्थांच्या यादीने करून दिली आहे.