नागपूर : गोंदिया येथील रहिवासी असलेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेतला. श्रद्धा संजय भिसे (१९) असे मृताचे नाव आहे. श्रद्धा पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात बीएससी (कृषी)ची विद्यार्थिनी होती. ती आपल्या मैत्रिणीसोबत धरमपेठ आंबेडकरनगर येथे भाड्याने राहत होती. तिची मैत्रिण गावाला गेली होती. श्रद्धा येथे एकटीच होती. शनिवारी सायंकाळी घर मालकाला ती खूप वेळापासून दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी श्रद्धाला आवाज दिला. याचदरम्यान श्रद्धाचा मित्र आला. घर मालकाने त्याला सांगितले.(प्रतिनिधी)
विद्यार्थिनीने घेतला गळफास
By admin | Updated: October 10, 2016 02:20 IST