शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

संसद बनतेय संघर्षाचा आखाडा

By admin | Updated: August 15, 2015 02:24 IST

लोकशाहीचा वारसा आपल्याला मिळाला असला तरी तो जपण्यासाठीही सदैव जागरूक राहण्याची गरज आहे. आज लोकशाहीच्या संस्था तणावाखाली आहेत. संसद हे चर्चा

नवी दिल्ली : लोकशाहीचा वारसा आपल्याला मिळाला असला तरी तो जपण्यासाठीही सदैव जागरूक राहण्याची गरज आहे. आज लोकशाहीच्या संस्था तणावाखाली आहेत. संसद हे चर्चा आणि मत-मतांतराचे व्यासपीठ न राहता संघर्षाचा आखाडा झाला आहे, अशी चिंता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी व्यक्त केली. राजकीय पक्ष आणि जनतेने या गंभीर मुद्द्यावर चिंतन करून उपाययोजना करावी, असे आवाहनही त्यांनी केले. सुधारणात्मक उपाययोजना आतून यायला हव्यात, यावरही त्यांनी भर दिला.स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात संसदेचे पावसाळी अधिवेशन सरकार आणि विरोधकांच्या संघर्षात वाया गेल्याची खंत राष्ट्रपतींनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. लोकशाही ही भारतीय राज्यघटनेने देशाला दिलेली अमूल्य देणगी आहे. गेल्या ६८ वर्षांत आपली लोकशाही एक जिवंत लोकशाही म्हणून विकसित झाली आहे. तिची पाळेमुळे भक्कम आहेत, पण पालवी मरगळू लागली आहे. त्यामुळे आता लोकशाहीच्या नवीनीकरणाची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. १९४७ मध्ये भारतवासीयांचे स्वप्न साकारणाऱ्या थोरांकडे आपण आज आदराने बघतो आहोत. आपण आता पावले उचलली नाहीत तर सात दशकानंतर आपल्या भावी पिढ्या उत्तराधिकारी आपल्याकडे सन्मान आणि आदराने बघतील काय, या प्रश्नाचे उत्तर सोपे नसले तरी, प्रश्न विचारायलाच हवा, असेही प्रणव मुखर्जी म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)दहशतवाद हाणून पाडू...आमच्या शेजारी देशांनी भारतविरोधी कारवायांसाठी त्यांच्या भूमीचा वापर करू देऊ नये. दहशतवाद खपवून न घेण्याचे भारताचे धोरण असून, अस्थैर्य आणि अशांतता निर्माण करण्यासाठी आमच्या सीमेत होणारी घुसखोरी समर्थपणे हाणून पाडली जाईल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रपती मुखर्जी यांनी पाकिस्तानचा नामोल्लेख टाळत दिला.