शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कठोर निवडणूक कायद्यासाठी आयोगाची जोरदार बॅटिंग

By admin | Updated: March 30, 2015 23:07 IST

निवडणुकीत राजकीय निधीच्या नावावर काळ्या पैशाच्या वापराला अटकाव घालण्यासाठी कठोर कायदा आणण्याच्या बाजूने निवडणूक आयोगाने जोरदार बॅटिंग केली.

नवी दिल्ली : निवडणुकीत राजकीय निधीच्या नावावर काळ्या पैशाच्या वापराला अटकाव घालण्यासाठी कठोर कायदा आणण्याच्या बाजूने निवडणूक आयोगाने जोरदार बॅटिंग केली. निवडणूक सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकारी निधीचा वापर अशक्य असल्याचे आयोगाने याआधीच स्पष्ट केले आहे. सोमवारी दिवसभराच्या चर्चासत्रात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.मुख्य निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा यांनी लोकशाही पद्धतीत निवडणुकीत काळ्या पैशाचा मुक्तपणे वापर होत असल्यास त्यामुळे निर्माण होणारे असंतुुलन रोखण्यासाठी कठोर कायद्याची गरज अधोरेखित केली.निवडणूक सुधारणांबाबत राजकीय, वित्त आणि विधि आयोगाच्या शिफारशींवर चर्चेसाठी आयोजित एक दिवसाच्या ‘सल्लामसलत’ बैठकीचे उद्घाटन करताना योग्य उत्तरदायित्वाची बाब पाहता देशाला राजकीय निधीबाबत कठोर कायदा आणण्याची गरज असल्याचे ब्रह्मा यांनी स्पष्ट केले. काळा पैसा, धनशक्ती (मनी पॉवर) आणि त्यापाठोपाठ मनगटी ताकदीच्या (मसल पॉवर) जोरावर निवडणूक प्रक्रियेत असंतुलन निर्माण केले जात असेल, तर ते निकोप लोकशाहीसाठी चांगले नाही. काळा पैसा लोकशाहीवर अतिक्रमण करीत असेल, तर त्यामुळे उमेदवारांना समान संधी दिली जात नाही. पैशाच्या बळावर मते मिळतातच असे नाही; मात्र इतरांच्या तुलनेत खर्च जास्त करणाऱ्याचा हात वरच राहतो, असे ते म्हणाले.आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी १५ कोटी रुपयांपर्यंत खर्च केल्याचे वृत्त आहे. त्यांच्याकडे पैसा कुठून येतो आणि कुठे जातो? असा आश्चर्यमिश्रित सवालही त्यांनी केला. धनशक्तीच्या मुद्यावर राजकीय पक्षांनी दिलेला प्रतिसाद पाहता पैशाच्या वारेमाप वापराला आळा घातला जावा यावर राजकीय पक्षांनी सहमती दर्शविली आहे.