शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या कुरापतींवर तीव्र चिंता

By admin | Updated: July 17, 2015 04:16 IST

इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तानातील परराष्ट्र विभाग तसेच दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांसमक्ष शस्त्रसंधी उल्लंघनाच्या वाढत्या घटनांबद्दल

नवी दिल्ली : इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तानातील परराष्ट्र विभाग तसेच दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांसमक्ष शस्त्रसंधी उल्लंघनाच्या वाढत्या घटनांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. बुधवारी पाकी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात एक महिला ठार तर सहा जण जखमी झाले होते. तत्पूर्वी पाकिस्तानचे विदेश सचिव एजाज अहमद चौधरी यांनी इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्त टीसीए राघवन यांना विदेश विभागात पाचारण केले होते. बनचिरियन सेक्टरमध्ये काल भारताकडून झालेल्या हवाई क्षेत्राच्या उल्लंघनाबद्दल चौधरी यांनी आक्षेप नोंदविल्याचे एका वक्तव्यात सांगण्यात आले. भारताचे हेरगिरी करणारे ड्रोन विमान पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात घुसले होते. पाकव्याप्त काश्मिरातील भिम्बर क्षेत्रात छायाचित्रे काढण्यासाठी या विमानाचा वापर करण्यात आला. त्यामुळे हे ड्रोन विमान पाडण्यात आले, असाही दावा पाकने केला आहे. मात्र हे विमान पाकिस्तानचेच असावे, अशी माहिती समोर आली आहे. डीजेआय फॅन्टम-३ हे ड्रोन विमान चिनी बनावटीचे असून, भारतीय संरक्षण यंत्रणेकडे चिनी बनावटीचे कुठलेही संरक्षण उपकरण अथवा साहित्य नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे विमान व्यावसायिक आहे. लष्करासाठी फारसे उपयुक्त नाही. पाकिस्तानात हे विमान सहज उपलब्ध असून, सर्वसामान्य लोकही ते खरेदी करतात. विशेष म्हणजे पाकिस्तानी पोलिसांकडूनही वाहतूक नियंत्रणासाठी या ड्रोनचा वापर केला जात असतो, असे समजते. (वृत्तसंस्था)पाकची आगळीक सुरूच; नागरिकांमध्ये दहशतजम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी गुरुवारी सतत दुसऱ्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत जम्मू जिल्ह्याच्या काही गावांमध्ये तसेच सीमेवरील पाच चौक्यांवर तुफान गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. यात चार जण जण जखमी झाले असून, नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जम्मूच्या दौऱ्यावर येणार असून या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले. बीएसएफ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाक सैनिकांनी आर.एस. पुरा सेक्टरजवळ आंतरराष्ट्रीय सीमेवर बुधवारी रात्री १.१५ वाजता लहान शस्त्रांनी गोळीबार आणि उखळी तोफा डागणे सुरू केले.