शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रेलरने पोलीस कर्मचा-यास चिरडले!

By admin | Updated: June 28, 2016 23:21 IST

राष्ट्रीय महामार्गावरील घटना; अपघातात पोलीस कर्मचारी नितीन निखार जागेवरच ठार.

अकोला: राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर हायवे पोलीस चौकीमध्ये कार्यरत असलेल्या एका हायवे ट्रॅप पोलीस कर्मचार्‍यास भरधाव ट्रेलरने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात पोलीस कर्मचारी नितीन निखार जागेवरच ठार झाले. या प्रकरणी ट्रेलर चालकास बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बाळापूर शहराबाहेर असलेल्या हायवे पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी नितीन निखारे मंगळवारी सकाळी मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर कार्यरत असताना खामगावकडून येत असलेल्या आरजे २७ जीए ४८८४ क्रमांकाच्या ट्रेलरला त्यांनी तपासण्यासाठी थांबण्याचा इशारा केला; मात्र ट्रेलर भरधाव असल्याने चालकाने सदर ट्रेलर राष्ट्रीय महामार्गावर कार्यरत असलेले निखार यांच्या अंगावर नेला. यामध्ये निखार ट्रेलरखाली चिरडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रेलर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला; मात्र निखार यांच्यासोबत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी ट्रकलचालकाचा पाठलाग करून त्याला अटक केली. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत देशमुख यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त ट्रेलर बाळापूर पोलिसांनी जप्त केला असून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंत्यसंस्कारासाठी पोलिसांची गर्दीनितीन निखार यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या गीता नगर येथील निवासस्थानी पोलीस अधिकार्‍यांसह पोलीस कर्मचार्‍यांची मोठी गर्दी झाली होती. मंगळवारी रात्री गीता नगर परिसरातील नदी काठावर असलेल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. नितीन निखार निष्णात मुष्टियोद्धापोलीस कर्मचारी नितीन निखार हे सिनिअर मुष्टियोद्धा होते. पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी करीत पोलीस दलासाठी त्यांनी अनेक मेडल खेचून आणले होते. पोलीस दलात कार्यरत होण्यापूर्वीच ते मुष्टियोद्धा म्हणून प्रसिद्ध होते. पोलिसांनी दिली मानवंदनाराष्ट्रीय महामार्गावर कार्यरत असताना नितीन निखार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी त्यांच्या अंतिम संस्कारापूर्वी अकोला पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलिसांनी हवेत तीन राऊं ड फायर केल्याची माहिती आहे.