छेडछाडीतून मारहाण; युवकाची आत्महत्या बरडमधील घटना : चौघांविरुद्ध गुन्हा; दोघांना अटक
By admin | Updated: August 11, 2015 00:03 IST
फलटण : छेडछाडीच्या संशयावरून मारहाण झालेल्या बरड येथील युवकाने रविवारी आत्महत्या केली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे व जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. रवी बागाव (२१) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
छेडछाडीतून मारहाण; युवकाची आत्महत्या बरडमधील घटना : चौघांविरुद्ध गुन्हा; दोघांना अटक
फलटण : छेडछाडीच्या संशयावरून मारहाण झालेल्या बरड येथील युवकाने रविवारी आत्महत्या केली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे व जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. रवी बागाव (२१) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.बरड येथील सोळा वर्षीय मुलीच्या छेडछाडप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या चौघांना मुलीच्या घरच्या लोकांकडून मारहाण झाली होती. याप्रकरणी परशुराम ऊर्फ पप्पू मिलिंद लोंढे याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, रवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण गावडे, श्रीरंग गावडे, संबंधित मुलीचा चुलता, अमर गावडे यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)चौकट :फलटणला आज मूकमोर्चारवी बागव या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गावडे कुटुंबीय, पोलीस अधिकारी व कर्मचार्यांवर जातिवाचक शिवीगाळचा गुन्हा नोंद करण्यात यावा, या मागणीसाठी मंगळवारी फलटण तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात येईल, असे महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडीचे राज्य सरचिटणीस विजय पाटोळे यांनी जाहीर केले आहे.