शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवर आता कडक सुरक्षा

By admin | Updated: April 13, 2016 02:37 IST

हल्ले, सीमेवरील घुसखोरी, तस्करी आणि अकस्मात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने भारत-पाक सीमेवर पाचस्तरीय सुरक्षा योजना (कॉम्प्रिहेन्सिव्ह बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टिम)

-  सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली

हल्ले, सीमेवरील घुसखोरी, तस्करी आणि अकस्मात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने भारत-पाक सीमेवर पाचस्तरीय सुरक्षा योजना (कॉम्प्रिहेन्सिव्ह बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टिम) लागू करण्यास मंजुरी दिली आहे. अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने वर्षभर २४ तास सीमेवर कडक नजर ठेवणारी ही योजना भारत पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर कच्छपासून काश्मीरपर्यंत २९00 किलोमीटर परिसरासाठी असेल. सीमेतून भारतात घुसखोरी होऊ नये यासाठी प्रत्येक ५ ते ६ किलोमीटर अंतरावर कंट्रोल रूम स्थापन केली जाणार आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास या कंट्रोल रूममधून सीमा सुरक्षा दलांना लगेच अलर्ट संदेश जारी होईल. युद्धक्षेत्रात पहारा ठेवणाऱ्या रडार यंत्रणेचा वापर करण्याबरोबरच सीमेवर जागोजागी अंडरग्राऊंड सेन्सर्सही बसवले जाणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे तर सज्ज असतीलच, त्याचबरोबर ज्या भागात तारांचे कुंपण नाही, अशा ठिकाणी लेजर अवरोधक उपकरणेही वापरली जाणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, थर्मल इमेजर्ससह रात्रीच्या अंधारात हालचालींचा वेध घेणाऱ्या यंत्रणा खरंतर सीमेवर पूर्वीपासून कार्यरत आहेत; मात्र त्यांची स्थिती फारशी चांगली नाही. त्यात आवश्यक दुरुस्त्याही या निमित्ताने केल्या जाणार आहेत. पाचस्तरीय नव्या व्यवस्थेचे वैशिष्ट्य असे की एका यंत्रणेच्या नजरेतून एखादी बाब सुटली तरी पर्यायी यंत्रणेच्या देखरेखीतून ती सुटणे शक्य नाही असे या योजनेचे सूत्र आहे. पूर्ण यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर पठाणकोटसारख्या हल्ल्यांची पुनरावृत्ती अशक्य होईल असा दावा संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी केला आहे.संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीमेवर कडक देखरेखीची नवी योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रत्येक किलोमीटर अंतराला किमान १ कोटी रुपये खर्च होणार आहेत. वारंवार होणारी घुसखोरी आणि दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी यापेक्षा दुसरा प्रभावी उपाय सरकारकडे उपलब्ध नाही. जम्मू व पंजाबमधे प्रस्तुत योजनेचे दोन पायलट प्रकल्प पूर्वीच सुरू झाले आहेत. येत्या दोन वर्षांत पश्चिम सीमेवर हे काम पूर्ण करण्याचा सरकारचा विचार आहे. योजना वेळेत पूर्ण व्हावी म्हणून ५0 ते ६0 खाजगी कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.