शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक सलोखा बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाई

By admin | Updated: October 8, 2015 04:54 IST

उत्तर प्रदेशातील एका मुस्लिम नागरिकाच्या हत्येचे तीव्र पडसाद उमटले असतानाच देशातील सांप्रदायिक सलोखा बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील एका मुस्लिम नागरिकाच्या हत्येचे तीव्र पडसाद उमटले असतानाच देशातील सांप्रदायिक सलोखा बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी बुधवारी दिला.दरम्यान, भारतीय जनता पक्षानेही दादरीकांडात प्रक्षोभक वक्तव्ये करणाऱ्या आपल्या नेत्यांवर लगाम कसताना या मुद्यावर राजकारण करण्याऐवजी एकोपा कसा कायम राहील याकडे लक्ष द्या, अशी ताकीद दिली आहे. राजनाथसिंग यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्य सरकार असो वा केंद्र, देशाच्या सांप्रदायिक सद्भावाला तडा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक शासन केले जाईल. गोमांस साठवून खाल्ल्याची अफवा पसरल्यानंतर गेल्या सोमवारी बिसहडा गावातील इखलाक नामक व्यक्तीची जमावाने हत्या केली होती.भाजप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षश्रेष्ठींनी उत्तर प्रदेशातील फायरब्रॅण्ड नेते योगी आदित्यनाथ, संगीत सोम, साक्षी महाराज आणि केंद्रीय मंत्रिद्वय महेश शर्मा व संजीव बलियान यांनी दादरीप्रकरणी केलेल्या वक्तव्यांवर नाराजी जाहीर केली असून भविष्यात आपल्या वाणीवर ताबा ठेवण्याची ताकीद दिली आहे.साध्वी प्राचींना रोखलेविश्व हिंदू परिषदेच्या साध्वी प्राची यांनी बुधवारी बिसहडा गावात जाण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रशासनाने त्यांना गावाबाहेरच रोखले. यावर नाराजी व्यक्त करताना हा कट असल्याचे सांगून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना अशाच पद्धतीने का रोखण्यात आले नाही? असा सवाल त्यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)