शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

स्वबळावर लढण्यासाठी पक्षाला मजबूत करा

By admin | Updated: July 3, 2016 00:45 IST

औरंगाबाद : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढायचे असेल तर गट आणि सर्कल पातळीवर पक्ष मजबूत केला पाहिजे,

औरंगाबाद : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढायचे असेल तर गट आणि सर्कल पातळीवर पक्ष मजबूत केला पाहिजे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.औरंगाबाद शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूकपूर्व तयारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार, आ. सुभाष झांबड, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी आमदार कल्याण काळे, माजी आमदार नितीन पाटील, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष केशवराव औताडे, पक्षाचे निरीक्षक नतीकोद्दीन खतीब, पक्षाचे सरचिटणीस किशोर बोरकर आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील पक्षाच्या सदस्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक सदस्यांनी आगामी निवडणुकीत कोणाबरोबरही आघाडी नको, स्वबळावरच निवडणुका लढवाण्यात, अशी भूमिका मांडली. त्याचा उल्लेख करून खा. चव्हाण म्हणाले की, स्वबळावर लढायचे असेल तर खाली पक्ष मजबूत असला पाहिजे. आम्ही मुंबईहून उमेदवार लादणार नाही, मात्र जिल्हा काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेस एखाद्या उमेदवारासंबंधीची माहिती पडताळून निर्णय घेईल. जात प्रमाणपत्र वैध असणाऱ्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली जाईल. जात प्रमाणपत्र वैध नसेल तर उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. पक्ष़ातर्फे महिनाभरात जिल्हा व प्रदेशस्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अर्ज स्वीकृती होईल, असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांची हजेरीयावेळी मेळाव्यात खा. चव्हाण यांनी कोणते जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका सदस्य अनुपस्थित आहेत, याची हजेरी घेतली. अनुपस्थित सदस्यांना पुढची निवडणूक लढवायची नाही, असे दिसत असून, त्यांचा विचार केला जाणार नाही, असा इशारा दिला. पक्षाच्या कार्यक्रमाला सर्वांची हजेरी आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.झांबड यांचा इशारायावेळी आ. सुभाष झांबड यांनी कार्यकर्त्यांच्या बाबतीत परखड मत व्यक्त केले. पक्षाची स्थिती चांगली असल्याचे जे लोक सांगत आहेत ते पक्षाची फसवणूक करीत आहेत. पक्षाची स्थिती खराब नाही मात्र प्रत्यक्षात खूप काम करण्याची गरज आहे. ४सिल्लोड, फुलंब्री वगळता इतर तालुक्यात मोठे काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आ. सत्तार यांनीही कार्यकर्त्यांनी झटून काम केल्यास निश्चित यश मिळेल, असे स्पष्ट केले. यावेळी खा. चव्हाण यांनी मराठवाड्यात चांगला पाऊस पडू दे, अशी ईश्वराजवळ प्रार्थना केली. त्यांनी सर्वांना शब-ए- कद्र तसेच रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. आ. सत्तार, आ. झांबड तसेच नामदेव पवार यांनीही सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. कौमी एकता हे आपल्या देशाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. शांतता आणि सौहार्दाच्या मार्गानेच देश चालला पाहिजे, असे मत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी पक्षातर्फे आयोजित इफ्तार कार्यक्रमात केले.४औरंगाबाद शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे बीड बायपासवरील पटेल लॉन्सवर हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, शहराध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी आमदार कल्याण काळे, केशवराव औताडे, सुरेशदादा पाटील, फिरोज पटेल, शब्बीर पटेल, माजी आमदार सुरेश जेथलिया, मिलिंद पाटील आदींसह पक्षाचे कार्यकर्ते आणि मुस्लिम समुदायातील नागरिक उपस्थित होते.