शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनावर वादळी ढग-(पान १)

By admin | Updated: July 12, 2015 21:35 IST

अधिवेशनावर वादळी ढग

अधिवेशनावर वादळी ढग
-मंत्र्यांचा भ्रष्टाचार, कर्जमाफीवरून विरोधक कामकाज बंद पाडणार; सरकारही सज्ज
मुंबई-राज्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळाचे सावट असले तरी सोमवारपासून सुरू होणारे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून अधिवेशनाचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा विरोधी पक्षाने दिला आहे, तर विरोधी पक्षातील काही प्रमुख नेत्यांची १७ प्रकरणे भाजपानेही आपल्या भात्यात ठेवली आहेत. सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर रविवारी बहिष्कार टाकून विरोधकांनी पहिली चाल खेळली आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, एमआयएम, समाजवादी पार्टी या पक्षाच्या नेत्यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यामध्ये चहापानावरील बहिष्काराचा निर्णय झाला. याबाबतची घोषणा करताना विखे-पाटील व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, राज्यातील शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी दिलेली नाही. दुबार पेरण्यांचे संकट शेतकर्‍यांवर आहे. गेल्या आठ महिन्यांत १५७६ शेतकर्‍यांनी आत्महत्या करूनही राज्यातील संवेदनाशून्य सरकार त्याची दखल घेत नाही, अशी टीका केली. त्याचवेळी सरकारमधील अनेक मंत्री हे भ्रष्टाचाराच्या वादळात सापडले आहेत. त्यांची मंत्रिमंडळातून हकालप˜ी झाल्याखेरीज अधिवेशनाचे कामकाज चालवू दिले जाणार नाही, असा इशाराही दिला.
मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचे स्टींग ऑपरेशन केले असून ते अधिवेशनात सादर करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी यापूर्वीच दिला आहे. विरोधकांच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याकरिता सरकारनेही विरोधकांची १७ प्रकरणे आपल्या भात्यात ठेवली आहेत. त्यामुळे हे अधिवेशन आरोप-प्रत्यारोपांनी गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. (विशेष प्रतिनिधी)
..................................
विरोधकांना चोख उत्तर देऊ-फडणवीस
विरोधकांच्या या भूमिकेचा समाचार घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे. विरोधकांनी गोंधळ घालण्यापेक्षा मुद्दे उपस्थित करावे त्याला समर्थपणे उत्तर देण्यास सरकार तयार आहे. सरकारच्या मंत्र्यांवर आरोप करताना विरोधकांनी पुरावे द्यावे. त्यामध्ये तथ्य असल्यास सरकार कुठल्याही चौकशीला तयार आहे.
..............................................
विधान परिषदेत होणार कोंडी
विधान परिषदेत सरकारकडे बहुमत नसल्याने तेथे सरकारची सत्वपरीक्षा आहे. त्यामुळे विधान परिषदेत एक-दोन विधेयके नामंजूर करवून घ्यायची व लागलीच ती विधानसभेत मांडून मंजूर करवून घ्यायची व विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्यायची, अशी रणनिती सत्ताधारी पक्षाने आखल्याचे समजते.
...............................
१५ विधेयके मांडणार
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात १५ विधेयके मांडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
...........................
कर्जाकरिता नाबार्डला हमी
राज्यातील शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध व्हावे याकरिता नाबार्डला ५०० कोटी रुपयांची हमी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. राज्यातील नऊ बँका आर्थिक डबघाईला आल्याने तेथील शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध होण्यात निर्माण झालेला अडसर दूर झाल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.