शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा व्हेरायटी चौकात रास्ता रोको

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

फोटो आहे...

फोटो आहे...
कार्यक र्त्यांना अटक : सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी
नागपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत लोकांना मोठमोठी आश्वासने दिली. परंतु सत्तेत येताच भाजप-शिवसेना युती सरकारने जनविरोधी धोरण राबविण्यास सुरुवात केली. या विरोधात शहर काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी व्हेरायटी चौकात माजी मंत्री नितीन राऊ त, शहर काँगे्रसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
सरकार विरोधात घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. काही वेळ चौकातील वाहतूक रोखल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. आंदोलनात यात अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, प्रफुल्ल गुडधे, उमाकांत अग्निहोत्री, दीपक कापसे, प्रशांत धवड, डॉ. गजराज हटवार, राजू व्यास, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके, जयंत लुटे, तानाजी वनवे, संजय दुधे, संजय दुबे, नगरसेविका निमिषा शिर्के, मालूताई वनवे, प्रेरणा कापसे, शीला मोहड, सिंधू उईके, पुष्पा निमजे, रेखा बाराहाते, सुरेश पिल्लेवार यांच्यासह शहर काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. केंद्र व राज्य सरकाने त्यांना अद्याप आर्थिक मदत दिलेली नाही. शेतकरी पॅकेजच्या नावाखाली तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. तसेच दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांना यातून वगळण्यात आले. निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळण्यास युती सरकारने नकार देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचे विकास ठाकरे म्हणाले.
भूमी अधिग्रहण कायद्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. उद्योगपती व बिल्डर यांनाच या धोरणाचा लाभ होणार आहे. दुसरीकडे उद्योगपतींच्या भल्यासाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना माफक दरात होणारा धान्यपुरवठा बंद केला आहे. वीजदरात वाढ करण्यात आली आहे. सवलतीत कपात करण्यात आल्याने सात हजार लघु उद्योजकांपुढे गंभीर संकट उभे ठाकल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.(प्रतिनिधी)
चौकट....
अटक व सुटका
शेकडो आंदोलकांनी स्वत:ला अटक करून घेतली. सर्वांना पोलीस मुख्यालयात ठेवण्यात आले होते. सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.