शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी शहिदांचे वाहन थांबविले

By admin | Updated: April 27, 2017 01:13 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना घेऊन निघालेल्या वाहनांच्या ताफ्याला जाऊ देण्यासाठी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना घेऊन निघालेल्या वाहनांच्या ताफ्याला जाऊ देण्यासाठी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या जवानांचे मृतदेह घेऊन निघालेले वाहन थांबवून ठेवण्यात आले होते. मंगळवारी हा प्रकार येथे घडला. छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात सोमवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २६ जवान ठार झाले होते. त्यात बिहारमधील सहा जवानांचा समावेश आहे. या जवानांचे मृतदेह घेऊन पाटणा विमानतळाकडे निघालेल्या ट्रकला नितीशकुमार यांना घेऊन निघालेल्या वाहनांना रस्ता देण्यासाठी थांबवण्यात आले होते.हुतात्मा जवानांना घेऊन निघालेल्या वाहनाला पाहून मुख्यमंत्र्यांनी थांबून त्यांना सलामी द्यायला हवी होती. विमानतळावर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ना मुख्यमंत्री गेले ना उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, असेही वृत्तात म्हटले.राज्यमंत्र्यांची टीका-या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठीही मुख्यमंत्री थांबले नाहीत. नितीशकुमार चित्रपट पाहून घरी परतत असताना त्यांची वाहने ज्या रस्त्याने गेली त्याच रस्त्याने मृतदेह घेऊन निघालेला ट्रक जाणार होता. नितीशकुमार यांचे वर्तन हे असंवेदनशील व दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या मंत्रिमंडळातील ग्रामीण विकास राज्यमंत्री राम कृपाल यादव यांनी व्यक्त केली.नितीशकुमार यांचे निवासस्थान पाटणा विमानतळापासून अवघ्या १०० मीटरवर असतानाही वीर जवानांना थांबून श्रद्धांजली वाहण्यास वेळ नव्हता हे आश्चर्यजनक आहे, असे यादव म्हणाले. विमानतळावर जवानांचे मृतदेह आल्यावर तेथे नितीशकुमारांच्या कार्यालयातील कोणीही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल यादव यांनी नाराजी व्यक्त केली.