शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
6
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
7
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
8
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
9
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
10
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
11
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
12
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
13
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
14
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
15
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
16
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
17
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
18
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
20
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

नारद मुनीसारखे वागणे बंद करा - जयराम रमेश

By admin | Updated: January 14, 2016 00:16 IST

काँग्रेसने देशातील आर्थिक परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करताना एकीकडे स्टार्टअप कार्यक्रमाच्या विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न आशेचा किरण असल्याचे सांगितले

- शीलेश शर्मा,  नवी दिल्ली काँग्रेसने देशातील आर्थिक परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करताना एकीकडे स्टार्टअप कार्यक्रमाच्या विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न आशेचा किरण असल्याचे सांगितले तर दुसरीकडे देशाची ढासळती अर्थव्यवस्था लक्षात घेत अर्थमंत्री अरुण जेटली यांना नारद मुनीचे काम करणे बंद करून अर्थमंत्रालयाच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक पारित करून घेण्याबाबत काँग्रेसमध्ये कुठलेही दुमत नाही. मतभेद भाजपा व सरकारमध्येच असून या कारणामुळेच सरकार जीएसटी पारित करीत नसल्याचा दावा काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केला. आपल्या या दाव्याच्या पुष्ट्यर्थ जीएसटीला विरोध असणाऱ्या ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्यासह अनेक मंत्र्यांची नामावलीच त्यांनी सादर केली. एवढेच नाहीतर गुजरात सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य करीत या सर्वांना जीएसटी नको असल्याचे सांगितले. मोदी सरकार आल्यापासून अर्थव्यवस्था ढासळली असल्याचा जयराम रमेश यांचा आरोप होता. ते म्हणाले, मोदी केवळ नारेबाजी करतात तर जेटली ब्लॉग लिहितात. १५ नोव्हेंबरला औद्योगिक विकास दराने चार वर्षातील नीचांक गाठला. रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. येत्या १६ जानेवारीला सुरू होणाऱ्या स्टार्टअप कार्यक्रमासाठी काँग्रेसने सहा सूचना केल्या असून पंतप्रधान या कार्यक्रमास प्रारंभ करताना त्यांचा विचार करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.