कोराडी वीज प्रकल्पातील वेल्डींग मशीन चोरीला
By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST
कोराडी वीज प्रकल्पातील वेल्डींग मशीन चोरीला
कोराडी वीज प्रकल्पातील वेल्डींग मशीन चोरीला
कोराडी वीज प्रकल्पातील वेल्डींग मशीन चोरीला नागपूर : कोराडी येथील नवीन वीज प्रकल्पातील वेल्डींग मशीन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. कोराडी येथे नवीन वीज प्रकल्पाचे काम सुरू आहे. येथील ९ नंबरच्या बॉयलर जवळ वेल्डींगची मशीन ठेवली होती. आकाश टेक्नो कंपनीची ही मशीन असून या मशीनची किमत १ लाख ३९ हजार ९१९ रुपये इतकी आहे. शनिवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वेल्डींग मशीन चोरीला गेल्याचे उघडकीस आले. कोराडी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.