शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
3
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
4
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
5
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
6
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
8
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
9
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
10
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
11
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
12
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
13
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
14
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
15
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
16
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
17
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
18
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
19
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
20
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली

गस्तीच्या पोलिसांनी उधळला चोरीचा डाव

By admin | Updated: September 18, 2016 22:35 IST

जळगाव: मध्यरात्री दुकान फोडण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने साहित्यासह पकडल्याने त्यांचा चोरी करण्याचा डाव फसला आहे. दरम्यान, तिघांनी दोन दिवसापूर्वी सेंट्रल फुले मार्केटमध्ये चार दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. यातील एक चोरटा सराईत आहेत. तिन्ही अल्पवयीन असून गेंदालाल मील भागातील रहिवाशी आहेत.

जळगाव: मध्यरात्री दुकान फोडण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने साहित्यासह पकडल्याने त्यांचा चोरी करण्याचा डाव फसला आहे. दरम्यान, तिघांनी दोन दिवसापूर्वी सेंट्रल फुले मार्केटमध्ये चार दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. यातील एक चोरटा सराईत आहेत. तिन्ही अल्पवयीन असून गेंदालाल मील भागातील रहिवाशी आहेत.
शहर पोलीस स्टेशनचे विजयसिंग पाटील, प्रितम पाटील, दुष्यंत खैरनार व संजय भालेराव शनिवारी रात्री गस्तीवर असताना फुले मार्केटमध्ये वॉचमन असलेल्या रतन बहादूर गोर यांना दोन जण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले.दोघांना हटकले असता त्यांनी रतन याच्याशी वाद घातला. त्यांच्या हातात टॉमी होती. त्यामुळे रतन याने हा प्रकार गस्तीवर असलेल्या पोलिसांना सांगितला, त्यांनी लागलीच घटनास्थळ गाठले, तितक्यात त्यातील एक जण फरार झाला व एक जण हातात लागला. पोलीस स्टेशनला आणून त्याची चौकशी केली असता आणखी दोन जणांची नावे समोर आली.त्यांच्या मदतीने फुले मार्केटमध्ये चार दुकाने फोडल्याचे त्याने सांगितले.
चोरीच्या पैशात केली मौजमस्ती
फुले मार्केटमधील श्री एजन्सीज या दुकानातून १३ हजार रुपये रोख चोरले होते, त्या पैशात तिघांनी मौजमस्ती केल्याचे तपासात निष्पन्न झाले. ताब्यात घेण्यात आलेल्या एकाची माहितीवरुन रविवारी सकाळी दोघांना गेंदालाल मील भागातून ताब्यात घेण्यात आले. यातील एक जण विशेष नावाने परिचीत आहे. त्याच्यावर यापूर्वी शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासाधिकारी दीपक गंधाले यांनी दिली. दरम्यान, तिघांकडून दोन हजार रुपये रोख व लोखंडी टॉमी जप्त करण्यात आली आहे.