पतंजलीच्या कार्यालयात चोरी
By admin | Updated: August 11, 2015 23:16 IST
नागपूर : पतंजलीच्या प्रतापनगरातील कार्यालयातून चोरट्यांनी एक लाखाची रोकड लंपास केली. सोमवारी पहाटे ही चोरीची घटना घडली.
पतंजलीच्या कार्यालयात चोरी
नागपूर : पतंजलीच्या प्रतापनगरातील कार्यालयातून चोरट्यांनी एक लाखाची रोकड लंपास केली. सोमवारी पहाटे ही चोरीची घटना घडली. आशिष लीलाधर वारडेकर (वय ३१) हे त्रिमुर्ती नगरातील सरस्वती विहार येथील पतंजलीच्या प्रतिष्ठान आणि कार्यालयाचे संचालन करतात. त्यांनी शनिवारी, रविवारी पतंजलीच्या उत्पादन विक्रीचे १ लाख रुपये कार्यालयात ठेवले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दाराचे कुलूप तोडून कार्यालयात प्रवेश केला आणि ही १ लाखांची रोकड चोरून नेली. सोमवारी सकाळी १० वाजता चोरीची घटना उघडकीस आली. वारडेकर यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.------