शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘हिंदू राष्ट्र’ वक्तव्य; नजमा यांचे घूमजाव

By admin | Updated: August 30, 2014 03:01 IST

सर्व भारतीय हिंदू असल्याचे वक्तव्य करून अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी नवीन वाद निर्माण केला आहे.

नवी दिल्ली : सर्व भारतीय हिंदू असल्याचे वक्तव्य करून अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी नवीन वाद निर्माण केला आहे. मात्र, लगेच त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देऊन घूमजाव केले. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या हिंदू राष्ट्रासंबंधी वक्तव्याचे त्यांनी समर्थन केले होते. आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना नजमा शुक्रवारी म्हणाल्या की, माझ्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. आपण सर्व भारतीयांना हिंदू नव्हे, तर हिंदी म्हटले होते. भारतात राहणाऱ्या नागरिकांना अरबी भाषेत हिंदी म्हटले जाते. या शब्दाचा वापर धर्माशी नव्हे, तर राष्ट्रीय ओळख म्हणून होता, असा खुलासा त्यांनी केला आहे. या वक्तव्यावरून नजमा यांच्यावर टीका झाली होती. आम्ही हिंदी आहोत, राष्ट्रीय ओळख म्हणून आम्ही हिंदुस्थानी आहोत. हिंदी, इंडियन आणि हिंदुस्थानी सर्व एक आहेत, असे नजमा म्हणाल्या. नजमा हेतपुल्ला यांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी टीका केली. घटनेनुसार आमचा देश भारत आहे आणि येथे राहणारे सर्व नागरिक भारतीय आहेत, हिंदू नव्हे, असे तिवारी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी नजमा यांचे वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. नजमा यांच्या वक्तव्यानंतर हा वाद येथे मिटल्याचे भाजपा नेते मुख्तार अब्बास नकवी म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)