शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

हे तर काळ्या पैशांचे राजकीय पुजारी; पंतप्रधान मोदी यांची टीका

By admin | Updated: January 9, 2017 01:47 IST

नोटाबंदीला विरोध करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुन्हा एकदा लक्ष्य केले. सरकारचा निर्णय लोकविरोधी

बंगळुरू : नोटाबंदीला विरोध करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुन्हा एकदा लक्ष्य केले. सरकारचा निर्णय लोकविरोधी असल्याचे सांगणारे लोक भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांचे राजकीय पुजारी आहेत. हेच लोक अर्थव्यवस्था, समाजाला खिळखिळे करीत आहेत, अशी टीका त्यांनी केली. सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या भारतीयांचे त्यांनी आभार मानले. विकासात भारतीयांच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या नागरिकांनी ६९ अब्ज डॉलरची गुंतवणूक करून भारतीय अर्थव्यवस्थेत अमूल्य योगदान दिले आहे. माझ्यासाठी एफडीआयच्या दोन व्याख्या आहेत, असे सांगून मोदी म्हणाले की, एक आहे ‘फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट’ आणि दुसरी ‘फर्स्ट डेव्हलप इंडिया.’ मी पूर्ण विश्वासाने सांगू इच्छितो की, २१वे शतक भारताचे आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोर्तुगालचे पंतप्रधान अ‍ॅटोनिओ कोस्टा यांची उपस्थिती होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते. आम्ही ब्रेन डेडला ब्रेन गेनमध्ये बदलू इच्छितो. विदेशात रोजगार शोधणाऱ्या भारतीय तरुणांसाठी सरकार लवकरच एक कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करणार आहे. ‘प्रवासी कौशल्य विकास योजना’ असे त्याचे नाव आहे. विदेशात आर्थिक संधी शोधणाऱ्यांना सरकार अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करेल. विदेशातील भारतीयांच्या सुरक्षेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो, असे सांगून ते म्हणाले की, आम्ही पासपोर्टचा रंग पाहत नाही तर रक्ताचे नाते बघतो. भारतीय प्रवासी संमेलनात सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी प्रवासी भारतीय पुरस्कार वितरित करणार आहेत. (वृत्तसंस्था)