शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात पाच बाबा-महाराज बनले राज्यमंत्री, राज्य सरकारचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 05:55 IST

वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने पाच हिंदू धार्मिक नेत्यांना मंगळवारी राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला. नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कम्प्युटर बाबा, भय्यू महाराज व पंडित योगेंद्र महंत यांना नर्मदा नदीच्या संवर्धन समितीवर नियुक्त करून, त्यांना सरकारने राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे.

भोपाळ - वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने पाच हिंदू धार्मिक नेत्यांना मंगळवारी राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला. नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कम्प्युटर बाबा, भय्यू महाराज व पंडित योगेंद्र महंत यांना नर्मदा नदीच्या संवर्धन समितीवर नियुक्त करून, त्यांना सरकारने राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे.लोकांच्या धार्मिक भावनांचा राजकीय लाभासाठी वापर करून घेण्याचा भाजपाचा हा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा स्वत:च पापांतून मुक्त व्हायचा प्रयत्न आहे. नर्मदेच्या संवर्धनाकडे चौहान यांनीच दुर्लक्ष केले आहे. राज्य सरकारने नदीच्या काठावर सहा कोटी झाडे लावल्याचा दावा असून, संतांनी ती झाडे शोधून काढावीत, असे काँग्रेसचे प्रवक्ते पंकज चतुर्वेदी म्हणाले.भाजपाचे प्रवक्ते रजनीश अग्रवाल यांनी मात्र काँग्रेसला संतांविषयी आदर आवडत नाही, असे म्हटले आहे. नर्मदेचे संवर्धन व पर्यावरणाचे काम करता यावे, यासाठी संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)माझ्या कामाचे बक्षीस मिळालेकम्प्युटर बाबा म्हणाले की, राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला गेला, यात चूक काय आहे? आमच्या कामाचे आम्हाला बक्षीस मिळाले आहे. कम्प्युटर बाबाने नर्मदा नदीच्या संवर्धन कामात झालेल्या प्रचंड भ्रष्टाचाराला उघड करण्यासाठी, या आधी नर्मदा घोटाळा रथयात्रा काढण्याची घोषणा केली होती.पंडित योगेंद्र महंत : मध्य प्रदेशात सुरू असलेल्या नर्मदा भ्रष्टाचार आंदोलनाचे पंडित योगेंद्र महंत समन्वयक आहेत. नदी संवर्धनात सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्याचा व वनीकरणासाठी निर्धारित केलेला निधी सरकारने इतर कामांसाठी वापरल्याचा आरोप त्यांनी केला होता. अमेरिकेतून चालविल्या जाणाºया विश्व ब्राह्मण संघाच्या मध्य प्रदेश शाखेचे ते अध्यक्ष आहेत, अशी माहिती त्यांच्या फेसबुक पेजवर दिलेली आहे.हरिहरानंद महाराज : मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेल्या ‘नमामी देवी नर्मदे सेवा यात्रा’ उपक्रमातील हरिहरानंद महाराज हे प्रमुख नेते आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुरू केलेल्या या यात्रेने ३,३४४ किलोमीटरचा प्रवास करीत, १,१०० गावांना भेटी दिल्या आहेत. मे २०१७ मध्ये या यात्रेचा समारोप झाला.भय्यूजी महाराजमूळ नाव उदयसिंग देशमुख. यांनी पूर्वी मॉडेलिंग केले आहे. त्यांचा अत्याधुनिक सोयी असलेला सूर्याेदय आश्रम इंदूरमध्ये आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिवंगत विलासराव देशमुख, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, गायिका लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, मिलिंद गुणाजी आदींनी आश्रमाला भेट दिली आहे. अनेक ज्येष्ठ नेते यांचा सल्ला घेतात. त्यांची स्वत:ची वेबसाइट आहे. अण्णा हजारे यांच्या २०११ सालच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात ते सहभागी होते. एका अभिनेत्याने केलेल्या फसवणुकीच्या आरोपामुळे ते वादात सापडले होते.कम्प्युटर बाबा : यांचे मूळ नाव आहे, स्वामी नामदेव त्यागी. आपला मेंदू कम्प्युटरपेक्षा अधिक वेगाने चालतो, असा यांचा दावा आहे. ते टेक्नोसॅव्ही आहेत. गेल्या वर्षी त्यांनी मंदिराच्या कारभारात मध्य प्रदेश सरकार ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप केला होता. त्यांना २०१४च्या कुंभमेळ्यात हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी मिळाली होती. नर्मदा संवर्धनाच्या कामातील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी ‘नर्मदा घोटाळा रथयात्रा’ काढण्याच्या तयारीत असतानाच ते राज्यमंत्री झाले आहेत.नर्मदानंद महाराज : हे महाराज हनुमानाचे कट्टर भक्त आहेत. रामनवमीसारख्या सणानिमित्त महाराज दरवर्षी राज्यभर भव्य रॅलींचे आयोजन करीत असतात. या रॅलींना लाभत असलेल्या प्रतिसादामुळे ते संपूर्ण मध्य प्रदेशात लोकप्रिय असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशnewsबातम्या