राज्य-महत्त्वाचे-विदर्भ
By admin | Updated: July 19, 2015 21:24 IST
मोटारपंप पळविला
राज्य-महत्त्वाचे-विदर्भ
मोटारपंप पळविलागोंदिया : डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या सितेपार येथील जयगोपाला संताराम बनकर यांच्या शेतात पाणी नेण्यासाठी चुलबंद नदीवर लावलेला मोटारपंप अज्ञात चोरट्यांनी पळविला. सदर घटनेसंदर्भात शनिवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेचा पैशासाठी छळयवतमाळ : वणी येथील लक्ष्मीनगरातील रहिवासी विनोद पेचे व त्याचे इतर पाच कुटुंबीय यांनी माहेरहून पैशाची मागणी करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. या प्रकरणी सदर विवाहितेने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भावगडचिरोली : चामोर्शी, मुलचेरा तालुक्यात काही ठिकाणी सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. पावसाने दडी मारल्याने दमट हवामान निर्माण झाला असल्याने किडीचा जोर वाढला आहे. अनेक फवारण्या करूनही कीड आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.रोहयो कार्यालय स्थानांतरितचंद्रपूर : सार्वजनिक बांधकाम मंडळाअंतर्गत असलेले रोजगार हमी योजना विभागाचे विभागीय कार्यालय नागभीड येथे स्थानांतरित करण्यात आले आहे. बांधकाम विभागाने हा निर्णय घेतला असून शुक्रवारी हा आदेश निर्गमीत करण्यात आला. या कार्यालयांर्तंगत ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली व चंद्रपूर हे सहा उपविभाग आहेत.