आजपासून मुस्तीच्या यात्रेस प्रारंभ
By admin | Updated: April 25, 2016 00:27 IST
सोलापूर :
आजपासून मुस्तीच्या यात्रेस प्रारंभ
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील ग्रामदैवत शेख उमरसाहेब यात्रेस सोमवार, 25 एप्रिलपासून प्रारंभ होत आह़े 25 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता संदल मिरवणूक, मंगळवार, 26 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजता मोठी संदल मिरवणूक, दंडवतीचा कार्यक्रम, रात्री 9 वाजता शोभेचे दारूकाम, बुधवार, 27 एप्रिल रोजी पारंपरिक खेळांचा प्रकार व सायंकाळी 5 वाजता कुस्ती स्पर्धा होणार आह़े रात्री 10 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आह़े यात्रेतील धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष रूद्रप्पा बिराजदार यांनी केले आह़ेटोमॅटोचे दर वाढलेसोलापूर : दुष्काळामुळे टोमॅटोच्या उत्पादनात मोठी घट झाली आह़े परिणामी दरात प्रतिदहा किलोमागे 20 ते 25 रूपयांची वाढ झाली आह़े सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे, सोलापूर, लातूर, औरंगाबादसह इतर जिल्?ांतून टोमॅटोची आवक होत आह़े टोमॅटो प्रति दहा किलोसाठी 20 ते 200 रूपये एवढा भाव मिळत आह़े मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने पालेभाज्यांसह इतर फळांच्या किमतीत सातत्याने घट होत आह़े