शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
13
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
14
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
15
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
17
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
18
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
19
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
20
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप

कामे सुरू करा, निधी मिळेल! सिंहस्थ कुंभमेळा : शासकीय खात्यांना पत्र

By admin | Updated: May 8, 2014 17:52 IST

नाशिक : गेल्या वर्षभरापासून निधी मिळत नसल्याचे कारण पुढे करून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांबाबत चालढकल करणार्‍या संबंधित खात्यांना आता कामे सुरू करा, निधी मिळवा असे म्हणावे लागत असून, त्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकार्‍यांनी थेट खात्यांना पत्र पाठवून स्मरण करून दिले आहे.

नाशिक : गेल्या वर्षभरापासून निधी मिळत नसल्याचे कारण पुढे करून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांबाबत चालढकल करणार्‍या संबंधित खात्यांना आता कामे सुरू करा, निधी मिळवा असे म्हणावे लागत असून, त्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकार्‍यांनी थेट खात्यांना पत्र पाठवून स्मरण करून दिले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने ४२३ कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून, त्यात एकट्या महापालिकेला २१८ कोटी रुपये, त्र्यंबक नगरपालिकेला ३२ कोटी रुपये दिले, तर रेल्वेलाही पाच कोटी वर्ग करण्यात आले आहेत. जवळपास १६८ कोटी रुपये कुंभमेळ्याच्या पीएलए खात्यांवर जमा आहेत. परंतु आजवर पैसे नसल्याच्या कारणावरून सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपलेला असताना कामे सुरू करण्यास विविध खात्यांनी अनुत्सुकता दर्शविली होती. या खात्यांकडे तगादा लावूनही निधीची तरतूद नसल्याने कामे सुरू करता येणार नाही, असा एकच धोशा त्यांनी लावला. त्यामुळे कुंभमेळ्याच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना राज्याच्या मुख्य सचिवांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही निधी उपलब्धतेच्या विषयावर चर्चा झाली. पण कुंभमेळ्याशी निगडित कामे सुचविताना संबंधित विभागांनी कामांची निकड व गरज याची सांगड योग्य प्रकारे न घातल्याने निधी देण्यातही अडचणी निर्माण झाल्या होत्या. राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात कुंभमेळ्यासाठी निधीची तरतूद करतानाच, संबंधित खात्यांच्या बजेटमध्येही सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी राखून ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. परिणामी संपलेल्या आर्थिक वर्षाअखेरीस ४२३ कोटी रुपये जिल्‘ाला प्राप्त झाले आहेत. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे सर्वच विभागांच्या कामांना त्याचा फटका बसला. विशेष करून दीर्घ मुदतीची महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी किमान दीड-दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे. त्यातही पावसाळा तोंडावर येऊन ठेपल्याने तर ही कामे कुंभेळ्याआधी पूर्ण होतील किंवा नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर गेल्याच आठवड्यात विभागीय आयुक्तांनी सर्वच खात्यांच्या प्रमुखांची बैठक घेऊन आचारसंहिता शिथिल होताच, कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु तरीही काही खात्यांची कूर्मगती सुरू आहे. एरव्ही निधी नसल्याने कामे नाकारणार्‍या खात्यांनी आता निधी उपलब्ध असूनही चालढकल चालविल्याने त्यांना कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी थेट लिखित स्वरूपात पत्रेच पाठविण्यात आली आहेत. कामांची निविदा व प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश दाखविल्यास तत्काळ निधी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.