शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मोफत गॅस कनेक्शनच्या ‘उज्ज्वला’ योजनेचा प्रारंभ

By admin | Updated: May 2, 2016 01:58 IST

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पाच कोटी एलपीजी कनेक्शन(घरगुती गॅस)देण्यासाठी आठ हजार कोटी रुपयांच्या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे उद्घाटन केले. यापूर्वीच्या

बलिया (उ.प्र.) : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पाच कोटी एलपीजी कनेक्शन(घरगुती गॅस)देण्यासाठी आठ हजार कोटी रुपयांच्या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे उद्घाटन केले. यापूर्वीच्या सरकारांनी गरिबांच्या घरांऐवजी मतपेटींवर लक्ष केंद्रित करीत निव्वळ घोषणा दिल्या होत्या, असा आरोप करतानाच त्यांनी जागतिक कामगारदिनानिमित्त ‘लेबर्स युनाइट द वर्ल्ड’ हा नारा दिला.कामगारदिनाचे औचित्य साधत त्यांनी उत्तर प्रदेशातील बलिया येथे उज्ज्वला योजनेचा प्रारंभ करताना त्यांनी रालोआ सरकारने कामगारांच्या कल्याणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देत स्वत:ला कामगार क्रमांक एक असे संबोधले. केवळ मतपेटींवर डोळा ठेवून योजना बनविल्या जातील तोपर्यंत गरिबी संपणार नाही. गरिबांना अधिकार बहाल केल्याने दारिद्र्याशी लढण्याची ताकद मिळेल आणि तेव्हाच गरिबी संपुष्टात येईल. त्यांना शिक्षण, नोकऱ्या, घरे, पिण्याचे पाणी आणि विजेसह संसाधने आणि संधी पुरविल्या जाव्या. आमचे सरकार गरिबांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी काम करीत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.गॅस कनेक्शन महिलांच्या नावेपंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील महिलांच्या नावे मोफत एलपीजी कनेक्शन पुरविले जातील. पहिल्यावर्षी दीड कोटी कनेक्शन दिले जातील. येत्या तीन वर्षांत पाच कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट गाठले जाईल. स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांत केवळ १३ कोटी गॅस कनेक्शन पुरविण्यात आल्याचे सांगत मोदींनी तुलनात्मक लेखाजोखा मांडला. २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या योजनेसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून कोणतेही रक्कम जमा न करता गरिबांना गॅस कनेक्शन मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली.‘लेबर्स युनाइट द वर्ल्ड’ नवा नाराजगभरातील कामगारांनी एकजूट व्हावे याऐवजी कामगार जगाला जोडतील(लेबर्स युनाइट द वर्ल्ड) हा नवा नारा देताना ते म्हणाले की, २१ शतकातील बदलत्या परिस्थितीत या मंत्रासोबतच जगाला जोडण्याची गरज आहे. कामगारांचा घाम हा सर्वात मोठा दुवा ठरावा. कामगारच जगाला एकत्र ठेवू शकतात. कामगारांना एकत्र ठेवण्याचा नारा देणारे लोक जगभरात आपला पाया गमावत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.५० वर्षांनंतर शिफारसपूर्तीउत्तर प्रदेशाने देशाला आठ पंतप्रधान दिले; मात्र या राज्यातील गरिबी का हटली नाही? जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना उत्तर प्रदेशातील घाझीपूरच्या खासदाराने पूर्व उत्तर प्रदेशातील गरिबीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर स्थापन झालेल्या आयोगाने अनेक शिफारशी केल्या. त्या शिफारशींचे काय झाले ते देवालाच माहीत. त्यापैकी एक शिफारस घाझीपूर आणि मऊ या गावांना रेल्वेने जोडण्याची होती. त्यानंतर ५० वर्षे उलटली. आम्ही हा रेल्वेमार्ग उभारत एका शिफारशीची पूर्तता करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.(वृत्तसंस्था)