शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारीसाठी ‘शी-बॉक्स’ वेब पोर्टल सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 12:01 IST

महिलांच्या तक्रारीसाठी महिला व बालविकास मंत्रालयाने सोमवारी ‘शी-बॉक्स’ नावाचं पोर्टल सुरू केलं आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 25-  नोकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ झाला तर त्याची तक्रार आता महिलांना करता येणार आहे. महिलांच्या तक्रारीसाठी महिला व बालविकास मंत्रालयाने सोमवारी ‘शी-बॉक्स’ नावाचं वेब पोर्टल सुरू केलं आहे. त्या पोर्टलवर आता केंद्र सरकारच्या नोकरीत असलेल्या महिलांना जर नोकरीच्या ठिकाणी लैंगिक छळाला सामोरं जावं लागलं तर थेट तक्रार करता येइल. नोकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होण्याचं प्रमाण किती आहे, याची देशव्यापी पाहणी करणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी म्हणाल्या आहेत. "शी-बॉक्स" हे पोर्टल सुरू केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मनेका गांधी बोलत होत्या.या पोर्टलची सुरुवात सध्या केंद्रीय कर्मचारी महिलांसाठी सुरु झाली असली तरी लवकरच याचा विस्तार करण्यात येईल आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी देखील ही सेवा सुरु केली जाईल, असं मनेका गांधी म्हणाल्या.
आणखी वाचा
 

मराठी खासदारांनी गाजविली संसद

पासपोर्टसाठी जन्माच्या दाखल्याची गरज नाही

कपड्यांवरून व्यक्तीचा ‘क्लास’ ठरतोय!

शी-बॉक्स हे पोर्टल जितकं परस्परसंवादी करता येईल तितकं करावं अशा सूचनाही मनेका त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ऑनलाईन व्यवस्थेत काही बदल करण्याची गरज आहे. ते केल्यानंतर खासगी नोकऱ्यांतील महिलाही तक्रारी या पोर्टलवर दाखल करू शकतील, असं मनेका गांधी यांनी स्पष्ट केलं आहे.  नोकरीच्या ठिकाणी महिलांशी होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून देण्याची घोषणा गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात करण्यात आली होती. विविध मंत्रालयातील महिलांनीच लैंगिक छळाच्या तक्रारी महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांच्याकडे केल्या होत्या.

 
नोकरीच्या ठिकाणी लैगिक त्रासाला सामोर जावं लागत असलं तरीही अनेक  महिला कर्मचारी सहकारी कर्माचाऱ्याची किंवा वरीष्ठ अधिकाऱ्याची तक्रार करताना बिचकतात. पण शी-बॉक्सच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या तक्रारी द्यायला माध्यम मिळतं आहे, असंही मनेका गांधी यांनी सांगितलं आहे. 
 
राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २०१४ पासून कामाच्या ठिकाणी विनयभंग व इतर  गुन्ह्य़ांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. २०१५ च्या आकडेवारीनुसार ११९ गुन्हे यात समोर आले होते तर त्यापैकी ७१ लोकांवर आरोपपत्रं ठेवण्यात आलं तर एकूण पाच जणांना शिक्षा झाली आहे.