शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये उद्योगांचे स्टार्ट अप नव्हे, तर शटडाऊन !

By admin | Updated: August 7, 2016 01:42 IST

भारतात सर्वत्र स्टार्टअप इंडियाच्या घोषणा दिल्या जात असल्या तरी बिहारमध्ये अनेक कारखाने बंद पडताना दिसत आहेत. पाटण्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर

- एस. पी. सिन्हा, पाटणा

भारतात सर्वत्र स्टार्टअप इंडियाच्या घोषणा दिल्या जात असल्या तरी बिहारमध्ये अनेक कारखाने बंद पडताना दिसत आहेत. पाटण्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मोकामा औद्योगिक वसाहतीतील दोन मोठे कारखाने गेल्या दोन वर्षांत बंद पडले असून, तिसऱ्या कारखान्यात टाळेबंदी लावण्यात आली असून तोही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मोकामा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेला बाटाचा कारखाना २0१४ साली बंद करण्यात आला. चामड्याच्या वस्तुंचा हा कारखाना १९४२ साली सुरू झाला होता आणि त्यात दोन हजारांहून अधिक कामगार काम करीत होते. तिथे २0१४ साली टाळेबंदी लागू करण्यात आली. नंतर हळुहळू कारखान्यातील यंत्रसामग्री अन्यत्र हलविण्यात आली आणि त्यामुळे कामगारांचा रोजगार बंद झाला.त्यानंतर यावर्षीच युनायटेड स्पिरीटने कारखाना बंद करून टाकला. विजय मल्ल्या यांचे वडिल विठ्ठल मल्ल्या यांनी फार वर्षांपूर्वी तो कारखाना सुरू केला होता. बिहारमध्ये दारूबंदी लागू केल्याने मद्यनिर्मिती करण्याचे आता काही कारण राहिले नाही, असे सांगत युनायटेड स्पिरीटच्या व्यवस्थापनाने कारखाना बंद केला. वास्तविक बिहारमध्ये दारूबंदी असली तरी मद्यनिर्मितीवर राज्य सरकारने कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. केवळ कारखान्यात तयार केलेली दारू राज्यात विकू नये, एवढीच अट या कंपनीला घालण्यात आली होती. तरीही व्यवस्थापनाने कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आणखी अडीच हजार कामगारांच्या नोकऱ्या गेल्या.नीति आयोगाने भारत वॅगन हा उद्योग तोट्यात चालत असल्याने बंद करण्यात यावा, अशी शिफारस केली आहे. रेल्वेला वॅगन पुरविणारी ही कंपनी असून, पूर्वी भारत हेवी इंडस्ट्रीज लिमिटेडचा भाग होती. लालुप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वेने हा कारखाना अधिग्रहित केला होता. हा कारखाना तरी वाचवा, अशी येथील कामगारांचीच नव्हे, तर त्यावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अवलंबून असलेल्या अनेकांची मागणी आहे.याशिवाय राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाची सूत गिरणीही बऱ्याच वर्षांपूर्वी बंद झाली आहे. त्यामुळे देशात स्टार्टअप आणि बिहारमध्ये शटडाउन असे चित्र निर्माण झाले आहे.भारत वॅगनमध्ये दीड वर्षांपासून टाळेबंदी आता भारत वॅगन कंपनीत कोणत्याही क्षणी टाळेबंदी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या कारखान्यातील उत्पादन गेले दीड वर्षे बंद आहे. कामगार २७ वर्षांपूर्वीच्या पगारावर आजही काम करीत असून, त्यांनी वेतनवाढीसाठी संप सुरू केला आहे. त्यानंतर ही टाळेबंदी जाहीर झाली.