शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

सिंगारे स्वीकारणार स्थायी समितीची सूत्रे

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

महापौरांची माहिती : आघाडीच्या नऊ सदस्यांच्या नावाची घोषणा

महापौरांची माहिती : आघाडीच्या नऊ सदस्यांच्या नावाची घोषणा
नागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे रमेश सिंगारे स्वीकारणार असल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेनंतर दिली. तत्पूर्वी यांनी सभागृहात स्थायी समितीच्या नऊ सदस्यांच्या नावांची घोषणा केली.
यात आघाडीचे रमेश सिंगारे, शरद बांते, संजय बालपांडे, श्रावण खापेकर, गोपी कुमरे, कांता लारोकर, विशाखा मैंद, नीता ठाकरे व किशोर डोरले यांच्यासह बसपाचे किशोर गजभिये, राष्ट्रवादीचे कामील अन्सारी व शिवसेनेचे जगतराम सिन्हा आदींचा समावेश आहे. स्थायी समिती सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो. ज्येष्ठतेच्या आधारावर दरवर्षी आठ सदस्य निवृत्त होतात. परंतु अधिकाधिक सदस्यांना संधी मिळावी यासाठी एक वर्षातच सदस्यांचा राजीनामा घेतला जातो.
भाजपच्या कोर कमिटीने स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सिंगारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. नगरसेवकांच्या संख्याबळाच्या आधारे आघाडीच्या नऊ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. इतर सदस्यांचीही नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांची नावे पुकारण्यात आली. उर्वरित चार सदस्यांचे राजीनामे व नवीन नावांची घोषणा पुढील सभेत करणार असल्याचे दटके यांनी सांगितले. (प्रतिनिधी )
चौकट...
मी पक्षाचा कार्यकर्ता
मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. जी जबाबदारी सोपविली जाईल, ती प्रामाणिकपणे पार पाडू. समितीच्या माध्यमातून समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया रमेश सिंगारे यांनी दिली.
चौकट...
शिवसेना संभ्रमात
संख्याबळाच्या आधारे शिवसेनेच्या एका सदस्याची स्थायी समितीवर निवड होऊ शकते. बंडू तळवेकर निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी जगतराम सिन्हा यांचे नाव गटनेत्या शीतल घरत यांनी दिले. परंतु अलका दलाल यांनी यावर आक्षेप घेत गटनेतेपदी किशोर कुमेरिया यांची निवड करण्यात आल्याची माहिती दिली. विभागीय आयुक्तांना याबाबतचे पत्र दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. परंतु सचिव हरीश दुबे यांनी आयुक्तांकडून कोणत्याही प्रकारचे पत्र मनपाला प्राप्त झाले नसल्याचे स्पष्ट केले. अखेर सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.