शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

रथयात्रेत चेंगराचेंगरी; २ ठार

By admin | Updated: July 19, 2015 02:34 IST

श्री जगन्नाथांच्या रथयात्रेत शनिवारी घडलेल्या चेंगराचेंगरीत दोन महिला ठार, तर अन्य १५ जण जखमी झाले. श्री जगन्नाथांचा रथ गुंडिचा मंदिराकडे भाविक ओढून नेत असताना

पुरी (ओडिशा) : श्री जगन्नाथांच्या रथयात्रेत शनिवारी घडलेल्या चेंगराचेंगरीत दोन महिला ठार, तर अन्य १५ जण जखमी झाले. श्री जगन्नाथांचा रथ गुंडिचा मंदिराकडे भाविक ओढून नेत असताना ही शोकांतिका घडली.बलगंदी चौकात एक महिला ठार झाली, तर दुसरी ६० वर्षांची महिला मरीचकोट चाकनजीक झालेल्या चेंगराचेंगरीत ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी दोघांना कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात हलविण्यात आले आहे. प्रचंड उकाडा आणि श्वास गुदमरल्याने ६० जण भोवळ येऊन पडले. त्यांना पुरीतील विविध इस्पितळांत दाखल करण्यात आले आहे.रथ ओढण्यासाठी भाविकांचा लोंढा रथाकडे धावला. रथ ओढताना विजयलक्ष्मी मोहंती (६५) खाली पडल्या. मागावून येणाऱ्या भाविकांच्या पायाखाली त्या तुडविल्या गेल्याने ठार झाल्या. दुसऱ्या मृत महिलेची ओळख मात्र पटली नाही. नऊ दिवसांच्या रथयात्रेसाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. लष्कराची फलटण, दहशतवादी विरोधी पथक, जलद कृती दल, एनएसजी कमांडोज महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले असून, किनारपट्टीवरही बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे. श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा देवीच्या नवीन मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक पुरीत जमले आहेत. शनिवारी नबकलेबर यात्रा परंपरेनुसार मोठ्या उत्साहाने काढण्यात आली. नबकलेबरमुळे ४५ दिवस या पावन मूर्ती आतच होत्या. पहिल्याच दिवशी श्री जगन्नाथ यांच्या नव्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या उत्साहाने जमले आहेत. (वृत्तसंस्था)