शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्टॅलिन आता द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष

By admin | Updated: January 5, 2017 02:55 IST

तामिळनाडूतील द्रमुक पक्षामध्ये नेतृत्वात फेरबदल करण्यात आले असून करुणानिधी (९३) यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन (६३) यांच्याकडे आता कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले आहे

चेन्नई : तामिळनाडूतील द्रमुक पक्षामध्ये नेतृत्वात फेरबदल करण्यात आले असून करुणानिधी (९३) यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन (६३) यांच्याकडे आता कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले आहे. करुणानिधी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. स्टॅलिन यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद देताना त्यांना सर्वाधिकारही प्रदान करण्यात आले आहेत. द्रमुकच्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एम. के. स्टॅलिन हे सध्या कोषाध्यक्ष म्हणून काम करीत होते. अलीकडच्या काळात करुणानिधी यांना दोन वेळेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तर सध्याही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गत ५० वर्षांत प्रथमच पक्षाच्या सर्वसाधारण परिषदेच्या बैठकीस ते उपस्थित नव्हते. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकच्या प्रमुखपदी शशिकला नटराजन यांची निवड झाल्यानंतर दोन दिवसांतच द्रमुकने हा निर्णय घेतला आहे. पक्षाचे महासचिव के. अनबझागन यांनी स्टॅलिन यांच्या कार्यकारी अध्यक्षपदासाठी प्रस्ताव मांडला. स्टॅलिन यांच्या निवडीनंतर द्रमुकच्या मुख्यालयात आणि निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. स्टॅलिन यांचे मदुराईतील मोठे बंधू एम. के. अळगिरी यांना २०१४ मध्ये पक्षविरोधी कारवायांच्या कारणास्तव पक्षातून काढून टाकण्यात आलेले आहे. (वृत्तसंस्था)जड अंत:करणाने जबाबदारी स्वीकारत आहे : स्टॅलिन या निवडीनंतर बोलताना स्टॅलिन म्हणाले की, करुणानिधी यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या पार्श्वभूमीवर नवी जबाबदारी अतिशय जड अंत:करणाने स्वीकारत आहे. नव्या जबाबदारीचा मला अभिमान आणि आनंद आहे. अर्थात, आज आपणाला अध्यक्ष बनण्याचा ‘तो’ आनंद नाही. आमच्या पक्षाचे अध्यक्ष, महासचिव अथवा अन्य वरिष्ठ नेत्यांनी दाखविलेल्या मार्गानेच आपण चालणार आहोत. सर्वांच्या सहकार्यानेच पक्षाचे काम पुढे नेऊ. ही जबाबदारी पार पाडताना मला निश्चितच आनंद होईल. माझ्याकडे हे पद अचानक आलेले नाही, तर या मुद्यावर चर्चा, विचारविनिमय करून निर्णय घेण्यात आला आहे. आजारानंतर आता करुणानिधी हे पूर्णपणे बरे होत आहेत. त्यांना आता आरामाची आवश्यकता आहे.