शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्टेडियम क्रिकेट क्लबला विजेतेपद

By admin | Updated: May 28, 2015 23:58 IST

स्टेडियम क्रिकेट क्लबला विजेतेपद

स्टेडियम क्रिकेट क्लबला विजेतेपद
टी-२० क्रिकेट स्पर्धा :
पुणे : अनिकेत कुंभार (४०), आदित्य परदेशी (२६ व ३/२२), विनायक बोजा (२/१५), मयुरेश रजपूत (२/१) यांच्या खेळामुळे स्टेडियम क्रिकेट क्लब संघाने गायकवाड क्रिकेट ॲकॅडमीचा ४९ धावांनी पराभव करून १९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत स्टेडियम करंडक जिंकला.
लॉ कॉलेजच्या मैदानावर झालेल्या या अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना स्टेडियम क्लबने निर्धारित २० षटकांत ९ बाद १४८ धावांपर्यंत मजल मारली. त्यांच्या अनिकेत कुंभारने ३० चेंडूंत ४० धावा केल्या, तर आदित्य परदेशीने २६ धावांची भर घातली. १४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गायकवाड क्लबचा डाव १९.१ षटकांत सर्व बाद ९९ धावांत संपुष्टात आला. त्यांच्या अनिकेत पाटील (१७) आणि आकाश सत्कार (१६) यांनी ३२ धावांची सलामी देऊन चांगली सुरुवात केली. यानंतर प्रतीक पोखर्णीकरने (३०) एकाकी लढत दिली. स्टेडियम क्लबच्या आदित्यने २२ धावांत ३, विनायक बोजाने १५ धावांत २ व मयुरेश रजपूतने एका धावेत २ बळी घेतले.
गायकवाड क्लबचा प्रतीक पोखर्णीकर सर्वोत्कृष्ट फलंदाज, स्टेडियम क्लबचा आदित्य परदेशी सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. स्टेडियम क्लबचा अनिकेत कुंभारला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून म्हणून गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक : स्टेडियम क्रिकेट क्लब : २० षटकांत ९ बाद १४८ (अनिकेत कुंभार ४०, आदित्य परदेशी २६, शुभम दोशी १३, प्रतीक पोखर्णीकर ४-२३, ओंकार राऊत २-२१) वि. वि. गायकवाड क्रिकेट क्लब : १९.१ षटकांत सर्व बाद ९९ (प्रतीक पोखर्णीकर ३०, अनिकेत पाटील १७, आकाश सत्कार १६, आदित्य परदेशी ३-२२, विनायक बोजा २-१५, मयूरेश राजपूत २-१). (क्रीडा प्रतिनिधी)
=============================