श्रीरामपूरला उशिरा व्यवहार पूर्ववत
By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST
श्रीरामपूर : पणन संचालकांच्या आदेशावरुन आडत शेतकर्यांकडून न घेता ती खरेदीदारांकडून घेण्याची नोटिसा मिळताच श्रीरामपूर बाजार समितीतील व्यापार्यांनी व्यवहार बंद ठेवले होते. मर्चन्ट असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कोठारी, उपाध्यक्ष अजय डाकले यांच्या अध्यक्षतेखाली व्यापार्यांची बैठक झाली. सोमवारी दुपारी या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर काही वेळाने व्यवहार सुरळीत करण्याचा निर्णय घेत व्यापार्यांनी बंद मागे घेतला. यावेळी रमेश बाठिया, संजय गाडेकर, मुकेश कोठारी, धनराज ललवाणी, संजय संचेती, नेमीचंद संचेती, अजय आंबेकर, राजेंद्र लखोटीया, किरण गंगवाल, नवल बोरा, अमित कोठारी, वर्धमान पाटणी, शरद कोठारी, नविन गदिया आदी उपस्थित होते.