नवी दिल्ली : बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना न्यायालयाने झटका दिल्यानंतर त्यांच्या कंपूत शांतता पसरली असून कोणीही यावर खुलेपणाने प्रतिक्रीया देण्यास तयार नाही. श्रीनिवासन यांची कंपनी इंडिया सिमेंट ही आयपीएल फ्रँचाईजी चेन्नई सुपर किंग्जची मालक असून तामिळनाडूच्या श्रीनिवासन यांना बीसीसीआयमधील आपली ताकत अबाधित ठेवायची असेल तर ते सीएसकेवरील आपली मालकी आणि हिस्सेदारी त्यागावी लागेल.बीसीसीआय की सीएसके यापैकी कोणला प्राधान्य द्यायचे हे तेच ठरवू शकतात.एका वरीष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले की, आपल्या कायदेशीर सल्लांगारांसोबत चर्चा करुनच श्रीनिवासन निर्णय घेतील. पण बीसीसीआयमध्ये श्रीनिवासन यांचे बहुमत आहे, याची मात्र मी तुम्हाला खात्री देवू शकतो. पूर्वेकडील संघटनांचे एक पदाधिकारी आणि श्रीनिवासन यांचे निकटवर्तीय काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, श्रीनिवासन यातून नक्की कायतरी मार्ग काढतील, ते लवकर हार मानणारे नाहीत. श्रीनिवासन यांनी चेन्नईतील आपल्या निवासस्थानासमोर प्रतिक्षा करणाऱ्या पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला, तर बीसीसीआयच्या अन्य अधिकाऱ्यांनीही यावर कोणतीही टिप्पणी केली नाही. (वृत्तसंस्था)
श्रीनिवासन यांनी भवितव्याचा निर्णय स्वत: घ्यावा
By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST