शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदेवीचा अपघात नव्हे, खून झाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 05:31 IST

आयपीएस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जगभरातील सिनेप्रेमींना धक्का देऊन गेलेली बॉलिवूडची चांदनी, अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू हा अपघात नसून खून होता, असा खळबळजनक दावा केरळचे डीजीपी आणि आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंग यांनी केला आहे. डॉ. उमादथन या मित्राच्या हवाल्याने त्यांनी हा दावा केला. ऋषिराज यांचे मित्र डॉ. उमादथन एक नावाजलेले फॉरेन्सिक सर्जन होते. अलीकडे त्यांचे निधन झाले.

डॉ. उमादथन हे गंभीर गुन्हे विशेषत: मर्डर मिस्ट्री उलगडण्यात ‘उस्ताद’ मानले जात. केरळ पोलीसही कुठल्याही हत्या प्रकरणाचा गुंता सोडवता आला नाही की, डॉ. उमादथन यांना बोलवत. फॉरेन्सिक तज्ञ असलेल्या डॉ. उमादथन यांनी अशा प्रकारे अनेक हत्या प्रकरणांची उकल केली होती. त्यांच्याच हवाल्याने ऋषिराज सिंग यांनी श्रीदेवींचा मृत्यू हा एक खून होता, असा दावा केला आहे.

यूएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. ऋषिराज यांनी म्हटले की, मी जिज्ञासेपोटी एकदा माझे मित्र डॉ. उमादथन यांना श्रीदेवीच्या मृत्यूबद्दल विचारले होते. पण त्यांच्या उत्तराने मी हादरून गेलो. मी हे संपूर्ण प्रकरण जवळून पाहिले, असे त्यांनी मला सांगितले होते. यादरम्यान श्रीदेवीचा मृत्यू हा अपघात नाही, अशा अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. डॉ. उमादथन यांनी या प्रकरणाचा बारकाईने अभ्यास केला होता. त्यातून हा खून आहे, असे अनेक पुरावे मिळाले होते.

डीजीपी ऋषिराज यांनी डॉ. उमादथन यांच्या निधनानंतर त्यांच्यावर एक लेख लिहिला होता. या लेखात डॉ. उमादथन यांनी सोडवलेल्या अनेक मर्डर मिस्ट्रींचा उल्लेख केला होता. याच लेखात एका कोपºयात श्रीदेवींच्या मृत्यूबाबत त्यांनी दिलेल्या निष्कषार्चाही उल्लेख होता.बाथटबमध्ये मृत्यू कसा काय होऊ शकतो?कुठलीही व्यक्ती नशेत असली तरी केवळ एक फूट खोल पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये तिचा मृत्यू होऊ शकत नाही, असे डॉ. उमादथन यांनी म्हटल्याचे ऋषिराज यांनी आपल्या लेखात नमूद केले होते. दुबईतील जुमेरा एमिरेट्स टॉवर्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये गतवर्षी २४ फेब्रुवारीच्या रात्री श्रीदेवीचा मृत्यू झाला होता.