शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 00:06 IST

Squadron Leader Mohana Singh, LCA Tejas fighter fleet: मोहना ही आतापर्यंत मिग-२१ चे संचालन करत होती.

Squadron Leader Mohana Singh, LCA Tejas fighter fleet: भारताची लेक स्क्वाड्रन लीडर मोहना सिंग हिने एक मोठी झेप घेतली. मोहना सिंग भारताच्या स्वदेशी LCA तेजस फायटर जेट फ्लीटचे संचालन करणाऱ्या एलिट 18 'फ्लाइंग बुलेट्स' स्क्वाड्रनमध्ये सामील होणारी पहिली महिला लढाऊ पायलट बनली. संपूर्ण देशातील विविध विभागातील पहिल्या टप्प्यातील महिला फायटर पायलट्स मध्येही तिचा समावेश आहे. तिची उल्लेखनीय कामगिरी देशातील प्रत्येक मुलीला या क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा देईल अशी अपेक्षा तिने उड्डाणानंतर व्यक्त केली. मोहनाची ही कामगिरी तिची महिला सक्षमीकरण आणि भारतीय हवाई दलासाठी असलेली वचनबद्धता दर्शवते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

देशातील पहिली महिला लढाऊ वैमानिक

अधिकारी मोहना सिंग ही नुकतीच 'मेड इन इंडिया' अंतर्गत जोधपूर येथे आयोजित 'तरंग शक्ती' या सरावाचा एक भाग होती, जिथे ती तिन्ही सेवांच्या तीन उपप्रमुखांच्या ऐतिहासिक उड्डाणाचा एक भाग होती. स्क्वॉड्रन लीडर मोहना सिंग भारतीय वायुसेनेमध्ये लढाऊ वैमानिक बनलेल्या तीन महिलांच्या पहिल्या गटाचा भाग आहे. तिच्याव्यतिरिक्त, स्क्वाड्रन लीडर भावना कंठ आणि स्क्वाड्रन लीडर अवनी चतुर्वेदी यांचा या गटात समावेश होता. त्या सध्या पश्चिम वाळवंटात Su-30 MKI लढाऊ विमानांचे संचालन करत आहेत.

देशातील महिला फायटर पायलट्समध्ये हळूहळू वाढ

मोहना ही आतापर्यंत मिग-२१ चे संचालन करत होती. अलीकडेच पाकिस्तान सीमेवर गुजरात सेक्टरमधील नलिया हवाई तळावर तैनात असलेल्या एलसीए स्क्वॉड्रनमध्ये ती तैनात होती. ऐतिहासिक उड्डाणा दरम्यान, स्क्वॉड्रन लीडर मोहना LCA तेजस फायटर जेटमधील फ्लाइटवर लष्कर आणि नौदलाच्या उपप्रमुखांना सूचना देताना आणि त्यांना तयारीसाठी मदत करताना दिसली. २०१६ मध्ये सरकारने महिलांसाठी फायटर स्ट्रीम उघडल्यापासून आता IAF मध्ये सुमारे 20 महिला फायटर पायलट आहेत.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलpilotवैमानिकfighter jetलढाऊ विमान